Mahila Samriddhi Yojana: कमी व्याज आणि 20 लाखांचं कर्ज, महिलांसाठी सरकारने सुरू केलीय नवी योजना
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Mahila Samriddhi Yojana: यामध्ये महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
मुंबई: महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुद्रा लोन योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने "लाडकी बहीण" आणि महिला समृद्धी कर्ज योजना आणली आहे. यामध्ये महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
महिलांना कर्जाचे फायदे
महिला समृद्धी कर्ज योजनेंतर्गत महिलांना 50,000 ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. या योजनेचा व्याजदर फक्त 4 टक्के असून, कर्ज परतफेडीचा कालावधी तीन वर्षे आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिला या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
बचत गटांसाठी विशेष योजना
महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने बचत गट कर्ज योजना सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येकी सदस्याला 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, तर बचत गटासाठी एकूण प्रकल्प मर्यादा 5 लाख रुपये आहे. महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची कमतरता भासू नये यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
advertisement
उद्दिष्ट आणि प्रोत्साहन
या योजनांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांच्या सामाजिक विकासाला चालना देणे. महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळावे, तसेच त्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण जीवनशैलीची संधी मिळावी, हा यामागचा प्रमुख हेतू आहे.
महिलांसाठी नव्या संधींचा मार्ग
महिलांसाठीच्या या योजनांमुळे त्या केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत, तर सामाजिकदृष्ट्या देखील सशक्त होतील. "लाडकी बहीण" आणि महिला समृद्धी कर्ज योजना महिला उद्योजकांसाठी एक उत्तम संधी आहे, जी त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.
advertisement
महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. इच्छुक महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या बचत गट अथवा सरकारी कार्यालयात संपर्क साधावा.
पात्रता काय आहे?
लाभार्थी हा मागासवर्गीय किंवा अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे,
बचत गट आणि समाजातील मागास घटकांमधील महिला उद्योजक या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
advertisement
लाभार्थी बीपीएल श्रेणीतील असणे आवश्यक
त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.
लाभार्थीचे किमान वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक
कर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपये आणि शहरी भागासाठी 1 लाख 20,000 रुपयांपर्यंत असावे.
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच दिला जाईल.
बचत गटाच्या स्थापनेनंतर किमान दोन वर्षांचा कालावधी लोटल्यास महिला बचत गटांना या योजनेचा लाभ होईल.
advertisement
अर्जदार महिला बचत गटाची सदस्य असणे आवश्यक
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 25, 2024 11:42 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Mahila Samriddhi Yojana: कमी व्याज आणि 20 लाखांचं कर्ज, महिलांसाठी सरकारने सुरू केलीय नवी योजना