advertisement

जिओ IPO पूर्वी रिलायन्सचा मोठा धमाका, शेअर्सना मिळाला 'टॉप पिक'चा दर्जा, मॉर्गन स्टॅन्लीने दिले 28% Upside

Last Updated:

Reliance Industries: रिलायन्स इंडस्ट्रीजला मॉर्गन स्टॅन्लीने ‘टॉप पिक’ घोषित करत 10 लाख कोटींच्या AI गुंतवणूक योजनेवर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. 1,803 रुपयांचे लक्ष्य देत समभागात 28 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई: मॉर्गन स्टॅन्लीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) या समभागाला आपली ‘टॉप पिक’ म्हणून घोषित करत पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे. रिलायन्स समूहाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात तब्बल 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केल्यामुळे हा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज हाऊसने RIL समभागांवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवत प्रति शेअर 1,803 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. हे लक्ष्य गुरुवारीच्या बंद भावाच्या तुलनेत सुमारे 28 टक्के वाढीची शक्यता दर्शवते.
मॉर्गन स्टॅन्लीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पुढील सात वर्षांत AI, डिजिटल पायाभूत सुविधा आणि संबंधित ऊर्जा पुरवठा क्षेत्रात 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची रिलायन्सची योजना ही भांडवली वाटपातील (capital allocation) पुढील मोठी झेप ठरेल. या गुंतवणुकीचा व्याप्ती यापूर्वीच्या दूरसंचार आणि ग्राहक व्यवसायातील मोठ्या विस्तारासारखाच आहे. ही अंमलबजावणी प्रामुख्याने जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांसोबत भागीदारीतून केली जाईल, अशी अपेक्षा ब्रोकरेजने व्यक्त केली आहे.
advertisement
याच आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी समूहाचा AI गुंतवणुकीचा रोडमॅप स्पष्ट केला. या योजनेत मल्टी-गिगावॅट क्षमतेची AI-रेडी डेटा सेंटर्स उभारण्याचा समावेश आहे. या प्रकल्पांना 10 गिगावॅटपर्यंत नवीकरणीय ऊर्जा क्षमता, ऊर्जा साठवण (energy storage) सुविधा आणि चिप इन्फ्रास्ट्रक्चरचा आधार दिला जाणार आहे. 2026 च्या दुसऱ्या सहामाहीत सुरुवातीची 120 मेगावॅट क्षमता कार्यान्वित होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाणार आहे.
advertisement
मॉर्गन स्टॅन्लीच्या अंदाजानुसार सध्या उभारणी सुरू असलेल्या AI पायाभूत सुविधांच्या पहिल्या 1 गिगावॅट टप्प्यासाठी सुमारे 12 ते 15 अब्ज डॉलर इतका भांडवली खर्च लागू शकतो. निधी उभारणीबाबत ब्रोकरेजने नमूद केले आहे की, रिलायन्स आपल्या विद्यमान व्यवसायांतून दरवर्षी सुमारे 14 ते 15 अब्ज डॉलर इतका ऑपरेटिंग कॅश फ्लो निर्माण करते, ज्यामुळे या गुंतवणुकीला आर्थिक आधार मिळू शकतो.
advertisement
ब्रोकरेजच्या मते, प्रस्तावित ‘इंटेलिजन्स’ व्यवसाय रिलायन्सच्या पूर्वीच्या मोठ्या गुंतवणुकांपेक्षा अधिक चांगले आर्थिक परतावे देऊ शकतो. करानंतर भांडवलावर परतावा (post-tax return on capital employed) 12 टक्क्यांपेक्षा जास्त आणि पाच वर्षांत इक्विटीवरील परतावा (return on equity) जवळपास 18 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे परतावे दूरसंचार किंवा किरकोळ (retail) व्यवसायातील परताव्यांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असतील.
advertisement
19 फेब्रुवारी रोजी इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये बोलताना मुकेश अंबानी यांनी या दीर्घकालीन योजनेची पुनरुच्चार केला. ही गुंतवणूक संयमित आणि शिस्तबद्ध भांडवल वापरावर आधारित असून, भारतासाठी स्वायत्त संगणन (sovereign compute) पायाभूत सुविधा उभारणे आणि ‘इंटेलिजन्स’चा खर्च कमी करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. रिलायन्स आणि जिओ आता भारताला केवळ डेटा कनेक्टिव्हिटी देण्यापासून पुढे जाऊन AI-आधारित सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देतील. यासाठी स्वतःची हरित ऊर्जा आणि देशव्यापी एज कम्प्युटिंग नेटवर्कचा आधार घेतला जाईल.
advertisement
ही घोषणा जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बहुप्रतिक्षित आयपीओपूर्वी आली आहे. रिलायन्सच्या तंत्रज्ञान आणि दूरसंचार शाखेचे मूल्य यापूर्वी सुमारे 170 अब्ज डॉलर इतके असल्याचे बँकर्सनी अंदाज वर्तवले होते. त्यामुळे भांडवली वाटप आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मितीबाबत गुंतवणूकदारांचे लक्ष अधिकच केंद्रीत झाले आहे.
शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग 0.9 टक्क्यांनी वाढून 1,422.2 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात या समभागात 15.3 टक्के वाढ झाली असून, निफ्टी निर्देशांकातील 11.7 टक्के वाढीपेक्षा ती जास्त आहे. कंपनीचे बाजारमूल्य सुमारे 19.1 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या समभागावर लक्ष ठेवणाऱ्या 37 विश्लेषकांपैकी 35 जणांनी ‘खरेदी’ (buy) करण्याची शिफारस दिली आहे.
advertisement
Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
 Disclaimer: News18marathi हे नेटवर्क18 समूहाचा भाग आहे. नेटवर्क18 वर इंडिपेंडंट मीडिया ट्रस्टचे नियंत्रण असून, त्याचा एकमेव लाभार्थी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
जिओ IPO पूर्वी रिलायन्सचा मोठा धमाका, शेअर्सना मिळाला 'टॉप पिक'चा दर्जा, मॉर्गन स्टॅन्लीने दिले 28% Upside
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement