पोस्ट ऑफिसची खास योजना, आठ लाख गुंतवणूक केल्यास दर महिन्याला किती पैसे मिळतील?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम आहे. ही महिन्याला ठराविक उत्पन्न देणारी योजना आहे.
सरकारी बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्यात पैसे गुंतवून तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक बचत योजना आहेत. त्यापैकी एक पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम आहे. ही महिन्याला ठराविक उत्पन्न देणारी योजना आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळते. या योजनेत किमान किती पैसे गुंतवता येतात, कमाल गुंतवणुकीची मर्यादा आणि आठ लाख गुंतवणूक केल्यास दर महिन्याला किती पैसे मिळतील? हे जाणून घेऊयात.
किमान किती रुपये गुंतवता येतात?
तुम्ही या योजनेत किमान 1000 रुपये गुंतवणूक करू शकता. या योजनेत एक खातेदार कमाल नऊ लाख रुपये गुंतवू शकतो आणि जॉइंट अकाउंट असेल तर कमाल 15 लाख रुपये गुंतवणूक करता येते.
आठ लाख रुपये जमा केल्यास महिन्याला किती पैसे मिळतील?
जर एखादी व्यक्ती पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम सेव्हिंग अकाउंट स्कीममध्ये आठ लाख रुपये जमा करत असेल तर ग्रोच्या गणितानुसार, तिला दर महिन्याला 4,933 रुपये मिळतील. याला तुम्ही व्याजाची रक्कमही समजू शकता.
advertisement
योजनेत किती व्याज मिळते?
या योजनेत गुंतवणूक केल्यास 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळते. इंडिया पोस्टच्या माहितीनुसार, या योजनेत 10,000 रुपयांवर एका महिन्याला 62 रुपये मिळतील. ते लगेच दिले जातील. अकाउंट उघडल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाला की व्याज दिले जाते. योजनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत अशाच पद्धतीने व्याज मिळते. मिळणाऱ्या व्याजावर क्लेम न केल्यास त्या व्याजावर व्याज मिळणार नाही. गुंतवणुकदाराने जास्त रक्कम जमा केल्यास ती परत दिली जाईल. अकाउंट उघडण्याची तारीख ते पैसे परत करण्याची तारीख याच दरम्यानचे व्याज मिळेल.
advertisement
योजनेचे इतर नियम
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अंतर्गत तुम्ही अर्ज करून अकाउंट उघडू शकता. अकाउंट उघडल्याच्या तारखेपासून पाच वर्षांनी तुम्ही ते बंद करू शकता. योजनेचा कालावधी पूर्ण होण्याआधी खातेधारकाचा मृत्यू झाल्यास अकाउंट बंद करता येते. अकाउंटमधील पैसे नॉमिनीला परत केले जातात. अकाउंट बंद करण्याआधीच्या महिन्याचे व्याज मिळते. तुम्ही अकाउंट उघडल्यावर एक वर्ष त्यातून पैसे काढू शकत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2024 10:12 PM IST