Business Idea: केक, बिस्किटं आणि मसाले बनवून व्हा उद्योजक, दिव्यांगांसाठी पुण्यात खास कार्यशाळा!

Last Updated:

Inspiring Story: सेवासदन दिलासा कार्यशाळेसाठी 18 वर्षांवरील आणि 45 वर्षांपर्यंतच्या दिव्यांगांना प्रवेश दिला जातो. विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले जाते.

+
Inspiring

Inspiring Story: केक, बिस्किटं आणि मसाले बनवून व्हा उद्योजक, दिव्यांगांसाठी पुण्यात खास कार्यशाळा!

पुणे: समाजात दिव्यांग व्यक्तींविषयी बोललं की, सहानुभूती, दया आणि वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहण्याची प्रवृत्ती आजही दिसून येते. मात्र दिव्यांग व्यक्तींच्या गुणांना वाव मिळावा, त्यांच्या हातातील कलेला दिशा मिळावी आणि त्यांना समाजात आत्मनिर्भर बनवावं, या उद्देशाने एरंडवणे परिसरात कार्यरत असलेली ‘सेवासदन दिलासा कार्यशाळा’ गेल्या चार दशकांपासून प्रौढ मानसिक दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यरत आहे. यातून दिव्यांगाना मानसिक आणि आर्थिक बळ मिळत असून जीवनाला वेगळी दिशा मिळत आहे. याबाबतच कार्यशाळेच्या व्यवस्थापिका मेघना जोशी यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
सेवासदन दिलासा कार्यशाळा येथे 18 वर्षांवरील आणि 45 वर्षांपर्यंतच्या दिव्यांगांना प्रवेश दिला जातो. शिक्षणाची पारंपरिक पद्धत या व्यक्तींना जड जात असली, तरी कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण, कला आणि कौशल्य शिकवले जात आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, तसेच समाजातील मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्नही केला जातो. सध्या जवळपास 80 जण येथे प्रशिक्षण घेत आहेत. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत कार्यशाळा सुरू राहते.
advertisement
बेकिंग विभाग
कार्यशाळेत आलेल्या दिव्यांगांना विविध कौशल्यांचा अनुभव दिला जातो. बेकिंग विभाग हा त्यातील विशेष आकर्षण आहे. यातून दिव्यांग युवक-युवतींना केक, बिस्किटे, लोणची, मसाले, चटण्या आणि शेव यांसारखे खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे सर्व पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातात आणि या प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींनाच विक्रीचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे त्यांना व्यवसायाशी संबंधित कौशल्ये आत्मसात करता येतात.
advertisement
क्राफ्ट विभाग
याशिवाय क्राफ्ट विभाग देखील कार्यशाळेचा महत्त्वाचा भाग आहे. राख्या, तोरणे, शोभेच्या वस्तू, पेपर शेडिंग, पेपर सॉर्टिंग यांसारख्या विविध हस्तकलेच्या उपक्रमात प्रौढ दिव्यांग सहभागी होतात. कार्यशाळेतील उत्पादनांचे एक स्वतंत्र विक्री केंद्रही आहे, ज्यातून या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात.
गार्डनिंग विभाग
गार्डनिंग हे देखील एक महत्त्वाचे प्रशिक्षण क्षेत्र आहे. रोपांची लागवड, त्यांची निगा राखणे, बाग सजवणे यांसारखी कामे करून दिव्यांग प्रौढांना निसर्गाशी जवळीक साधता येते. त्याचबरोबर योग, नृत्य, चित्रकला, रांगोळी, गणेशमूर्ती बनवणे यांसारखे सांस्कृतिक व सर्जनशील उपक्रम देखील कार्यशाळेत राबवले जातात. यामुळे मानसिक आणि शारीरिक क्षमतांची वाढ होते. विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी या मुलांना मानधनही दिलं जातं, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या श्रमाचं मूल्य समजतं.
advertisement
पुणे शहरासह उपनगरांमधूनही अनेक दिव्यांग प्रौढ या कार्यशाळेत येतात. या सर्वांना शाळेच्या बसची सोय उपलब्ध करून दिली जाते. कार्यशाळेच्या व्यवस्थापिका मेघना जोशी सांगतात, “या मुलांमध्ये अनेक गुण दडलेले असतात. त्यांना योग्य संधी मिळाली, तर ते समाजात आपला वेगळा ठसा उमटवू शकतात. आमचं उद्दिष्ट म्हणजे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करणे आणि समाजाशी त्यांचा संवाद अधिक दृढ करणे.”
advertisement
सेवासदन दिलासा कार्यशाळा हे फक्त प्रशिक्षण देणारं ठिकाण नाही, तर दिव्यांग प्रौढांना आत्मनिर्भरतेकडे नेणारं एक केंद्र आहे. समाजात सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा यासाठी केलेला हा प्रयत्न गेली 40 वर्ष यशस्वी ठरत असून, येत्या काळातही अनेक दिव्यांग प्रौढांच्या जीवनात नवी आशा निर्माण करत राहील.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Business Idea: केक, बिस्किटं आणि मसाले बनवून व्हा उद्योजक, दिव्यांगांसाठी पुण्यात खास कार्यशाळा!
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement