10 आणि 500 रुपयांच्या नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय, जुन्या नोटांचं काय होणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
RBI लवकरच 10 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार आहे. या नोटांमध्ये रंग, आकार आणि डिझाइनमध्ये बदल होणार आहेत. जुन्या नोटा वैध राहतील.
मुंबई: तुमच्याकडे जर 10 रुपयांच्या जुन्या नोटा असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. RBI ने जुन्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 10 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार आहे. यासोबत या नोटांच्या रंग, आकार आणि डिझाइनमध्ये मोठे बदल होणार आहेत. यापूर्वी नोटाबंदीनंतर आरबीआयने 500 रुपयांची लहान साईजची नोट जारी केली होती. आता पुन्हा एकदा या नोटांमध्ये बदल होणार आहेत.
नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असलेल्या नोटा
आरबीआयने स्पष्ट केलं आहे की, या नवीन नोटा महात्मा गांधी (नवीन) शृंखलेअंतर्गत असतील आणि त्यावर नविन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे स्वाक्षरी असतील. डिझाइनच्या दृष्टीने या नवीन नोटा सध्याच्या 10 आणि 500 रुपयांच्या नोटांप्रमाणेच असतील. म्हणजेच, काही सूक्ष्म बदल वगळता मूळ संकल्पना कायम राहणार आहे.
advertisement
जुने नोटांचं काय होणार?
नवीन नोटा येणार असल्या तरी, सध्या चलनात असलेल्या 10 आणि 500 रुपयांच्या नोटा बंद होणार नाहीत. आरबीआयने स्पष्ट सांगितलं आहे की, आधी जारी झालेल्या नोटाही वैधच राहणार आहेत आणि त्या नेहमीप्रमाणे बाजारात चालणार आहेत. मागच्या महिन्यातच आरबीआयने 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा आणण्याची घोषणा केली होती. आता त्यात 10 आणि 500 रुपयांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे लवकरच बाजारात तुम्हाला नव्या रूपातील नोटा दिसणार आहेत आणि त्या संजय मल्होत्रा यांच्या सहीसह असतील.
advertisement
रंग, आकार आणि डिझाइनमध्ये होणार मोठा बदल
500 रुपयांच्या सध्याच्या नोटा स्टोन ग्रे रंगाच्या आहेत. मात्र, आता नवीन नोटांमध्ये रंग, साईज, थीम, सिक्युरिटी फीचर्स आणि त्यांची लोकेशन यामध्ये मूलगामी बदल होणार आहेत. नवीन 500 रुपयांच्या नोटेचा आकार 66 x 150 मिमी असा असेल, जो आताच्या नोटेपेक्षा वेगळा असेल. नोटांचे हे नवे रूप हे फक्त चलन सुधारणा आहे, जुन्या नोटा रद्द करत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2025 11:39 AM IST








