SBI ग्राहकांना मोठा झटका! पैसे ट्रान्सफर केल्यास भरावं लागेल शुल्क, काय नवीन नियम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
SBI ने IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यावर शुल्क लागू केले आहे. 25 हजारांपर्यंत शुल्क नाही, 25 हजार ते 1 लाख 2 रुपये, 1 लाख ते 2 लाख 6 रुपये शुल्क आहे.
तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. SBI वरुन पैसे ट्रान्सफर करणं म्हणजे खिशाला कात्री लागण्यासारखं होणार आहे. पैसे ट्रान्सफर करण्यावर बँकेकडून अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. हा नियम नेमका कुणाला कधी आणि कसा लागू होणार? त्याचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होणार आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
देशातील सर्वात मोठी आणि विश्वासू बँक म्हणून आजही स्टेट बँक ऑफ इंडियाकडे पाहिलं जातं. या बँकेनं रातोरात घेतलेल्या एका निर्णयामुळे कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करणाऱ्यांच्या नियमामध्ये बँकेनं बदल केला आहे. हा नियम 15 ऑगस्टपासून लागू केला जाणार आहे.
SBI ने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार बँकेतून IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर केल्यास त्यावर अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल. मात्र 25 हजार रुपयांपर्यंत बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही. म्हणजे 25 हजार रुपयांपर्यंत फ्रीमध्ये तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. मात्र 25 हजारहून एक रुपया किंवा 1 लाख रुपयांपर्यंत तुम्ही कितीही रक्कम ट्रान्सफर केली तरी त्यावर 2 रुपये आकारले जाणार आहेत.
advertisement
प्रत्येक ट्रान्झॅक्शनमागे हे शुल्क आकारले जाईल मात्र नियम हाच असेल की 25 हजार रुपयांहून अधिक रक्कम असेल तरच. UPI द्वारे पेमेंट केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अशी सध्या तरी माहिती मिळाली आहे. मात्र बँकेकडून तसे कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेलं नाही.
1 लाख ते 2 लाखरुपये पैसे ट्रान्सफर केल्यास 6 रुपये आणि 2 ते 5 लाख रुपये ट्रान्सफर केल्यास 10 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शुल्कासोबत GST चे वेगळे पैसे देखील घेतले जातील. उदाहरणार्थ 25 हजार रुपयांपर्यंत कोणतेही शुल्क नाही. 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत 2 रुपये अधिक त्यावरील GST जो होईल तो ग्राहकांना भरावा लागणार आहे.
advertisement
पगार पॅकेज खातेधारकांना ऑनलाइन IMPS व्यवहारांवर पूर्ण सूट मिळत राहील. कॉर्पोरेट ग्राहकांसाठी सुधारित सेवा शुल्क 8 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल. यासोबतच, चालू खाते श्रेणी (सोने, हिरा, प्लॅटिनम, रोडियम, सरकारी विभाग, स्वायत्त/वैधानिक संस्था) यांना ऑनलाइन IMPS वरील शुल्कातून सूट मिळत राहील.
IMPS म्हणजे काय
इमिडिएट पेमेंट सेवा म्हणजेच IMPS ही रिअल टाइम पेमेंट सेवा आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध आहे. ती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे चालवली जाते. या सेवेद्वारे, ग्राहक कधीही त्वरित पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 9:57 AM IST