Share Market Crash: इस्रायल-इराणचे गॅस फिल्डवर हल्ले, युद्धाच्या आगीत बाजार होरपळला, गुंतवणूकदारांचे १० मिनिटांत ७ लाख कोटींचा चुराडा, ५ कारणे...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Share Market Crash Iran War: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेअर बाजारातील तेजीला गुरुवारी अचानक ब्रेक लागला. जागतिक घडामोडी आणि विशेषतः पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे गुरुवारी सकाळी बाजार उघडताच मोठी पडझड पाहायला मिळाली.
मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेअर बाजारातील तेजीला गुरुवारी अचानक ब्रेक लागला. जागतिक घडामोडी आणि विशेषतः पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे गुरुवारी सकाळी बाजार उघडताच मोठी पडझड पाहायला मिळाली. सकाळी १० वाजेच्या सुमारास सेंसेक्स १५१८ अंकांनी घसरून ७५,१८५ वर आला, तर निफ्टी ४५६ अंकांच्या घसरणीसह २३,३२१ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.
आखाती देशांत युद्धाची धग...कतारवर मिसाईल्सचा पाऊस
इस्रायलने इराणच्या सगळ्यात मोठ्या गॅस फिल्डवर हल्ला केल्यानंतर इराण प्रत्युत्तर देणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. इराणने बुधवारी रात्री कतारमधील सर्वात मोठ्या 'रास लफान' गॅस प्लांटवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यामुळे प्लांटमध्ये भीषण आग लागली असून मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. कतारने या हल्ल्याचा निषेध करत इराणने आता सीमा ओलांडल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, इराणचे नवीन सर्वोच्च नेते मुजतबा खामेनेई यांनी सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली असून, "प्रत्येक रक्ताच्या थेंबाची किंमत मोजावी लागेल," असा इशारा दिला आहे.
advertisement
बाजारातील घसरणीची ५ मोठी कारणे काय?
कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडाल्याने बाजारावर त्याचा परिणाम झाला. ब्रेंट क्रूड ११० डॉलरच्या पार गेल्याने भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशासाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे. यामुळे महागाई वाढण्याची भीती आहे.
इराण आणि कतारमधील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमधील गॅस फिल्डचे क्षेपणास्त्र हल्ल्यात मोठं नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम जागतिक गॅस पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे.
advertisement
अमेरिकन फेडने व्याजदरात बदल केला नसला तरी, भविष्यात महागाई नियंत्रणासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. फेडच्या या संकेताचे पडसाद बाजारावर उमटले.
गेल्या तीन दिवसांच्या तेजीनंतर गुंतवणूकदारांनी वरच्या पातळीवर नफा कमावण्यास सुरुवात केल्याने विक्रीचा दबाव वाढला.
भारतीय रुपया विक्रमी निचांकी पातळीवर पोहोचल्याने परकीय गुंतवणूकदारांनी (FII) बाजारातून पाठ फिरवली आहे. डॉलर विनिमय दर ९३.०३ रुपयांवर गेला. तज्ज्ञांच्या मते, जर कच्च्या तेलाच्या किमती अशाच चढा राहिल्या आणि युद्धाचा व्याप्ती वाढली, तर बाजार पुढील काही काळ दबावाखाली राहू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 10:52 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market Crash: इस्रायल-इराणचे गॅस फिल्डवर हल्ले, युद्धाच्या आगीत बाजार होरपळला, गुंतवणूकदारांचे १० मिनिटांत ७ लाख कोटींचा चुराडा, ५ कारणे...







