Penny Stocks: 40 रुपयाच्या खाली लॉजिस्टिक पेनी स्टॉक, खरेदी करण्यासाठी अनेकांच्या उड्या
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
एनईसीसी अर्थात नॉर्थ इस्टर्न कॅरिइंग कॉर्पोरेशन लिमिटेड या लॉजिस्टिक कंपनीच्या स्टॉकबद्दल जाणून घेऊ या.
Share Market: भारतीय शेअर बाजारात सोमवारी चढ-उतार पाहायला मिळाले. सेन्सेक्स आज (30 डिसेंबर) 450.94 अंक म्हणजेच 0.57 टक्क्यांनी घसरून 78,248.13 अंकांवर बंद झाला. निफ्टी 168.50 अंक म्हणजेच 0.71 टक्क्यांनी घसरून 23,644.90 अंकांवर बंद झाला आहे. बाजारात आज नकारात्मक कल राहिला. मार्केट अॅक्टिव्हिटीजमध्ये स्टॉक स्पेसिफिक अॅक्शन्स पाहायला मिळत आहेत. एनईसीसी अर्थात नॉर्थ इस्टर्न कॅरिइंग कॉर्पोरेशन लिमिटेड या लॉजिस्टिक कंपनीच्या स्टॉकबद्दल जाणून घेऊ या.
एनईसीसी अर्थात नॉर्थ इस्टर्न कॅरिइंग कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या शेअर प्राइसमध्ये सोमवारी तेजी पाहायला मिळाली. ही तेजी सुमारे 11 टक्के होती. हा स्टॉक 36.75 रुपयांच्या दिवसातल्या उच्चांकावर पोहोचला. या कंपनीचं मार्केट कॅप 359.75 कोटी रुपये एवढं आहे.
ही 1984 साली स्थापन झालेली भारतातली एक प्रमुख लॉजिस्टिक कंपनी असून, मालवाहतुकीची सेवा देते. कंपनीच्या तिमाही रिझल्ट्सच्या आकडेवारीनुसार, Q2FY25मध्ये कंपनीने 8194 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली. Q2FY24मध्ये कंपनीची निव्वळ विक्री 73.84 कोटी रुपये होती. म्हणजेच एका वर्षात त्यात 11 टक्के वाढ झाली. Q2FY25मध्ये निव्वळ नफा 149.3 टक्के वाढून 2.87 कोटी रुपये झाला. Q2FY24मध्ये तो 1.15 कोटी रुपये एवढा होता. अर्धवार्षिक रिझल्ट्सचा विचार केला, तर H1FY24च्या तुलनेत H1FY25मध्ये नेट सेलिंग 1.20 टक्क्यांनी वाढून 159.58 कोटी रुपये झालं. नेट प्रॉफिट 148 टक्क्यांनी वाढून 6.55 कोटी रुपये झालं.
advertisement
या कंपनीच्या 250हून अधिक शाखा असून, अत्याधुनिक ईआरपी सॉफ्टवेअर नेटवर्कसह छोट्या पार्सलपासून मोठ्या प्रोजेक्टपर्यंत लॉजिस्टिकसाठी आवश्यक त्यासर्व बाबींची चेन आहे. या कंपनीने बजाज ऑटो, मिंडा इंडस्ट्रीज आयटीसी लिमिटेड आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज यांसारख्या प्रमुख महामंडळांशी दृढ भागीदारी केली आहे. मोठ्या कालावधीत विश्वसनीय आणि अभिनव सप्लाय चेन सॉल्युशन देण्याची आपली कटिबद्धता कंपनी यातून दर्शवते. या कंपनीच्या व्यावसायिक बाबींमध्ये एक्स्प्रेस पीटीएल/पार्सल लोड, फुल ट्रक लोड, बल्क ट्रान्स्पोर्टेशन, ओडीसी मूव्हमेंट आणि वेअरहाउसिंग, तसंच डिस्ट्रिब्युशनसह सर्व्हिसच्या एका मोठ्या साखळीचा समावेश आहे. ग्रीन लॉजिस्टिक आणि अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचा वापरही ही कंपनी करते.
advertisement
कंपनीचा शेअर आज 11 टक्के उसळून 36.80 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. इंट्राडेमध्ये हा शेअर 33 रुपयांच्या खालच्या पातळीवर होता. या स्टॉकच्या किमतीत 1.01 पटीहून अधिक तेजी आली. या स्टॉकची 52 आठवड्यांतली उच्चांकी पातळी 44.44 रुपये आहे. तसंत, 52 आठवड्यांतली नीचांकी पातळी 21.99 रुपये आहे. सध्या हा स्टॉक पाच आठवड्यांच्या उच्च पातळीच्या दिशेने जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 30, 2024 10:27 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Penny Stocks: 40 रुपयाच्या खाली लॉजिस्टिक पेनी स्टॉक, खरेदी करण्यासाठी अनेकांच्या उड्या