Share Market: रुपया गडगडला, सेन्सेक्स-निफ्टी क्रॅश, या शेअर्सला सर्वात जास्त फटका
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आठवड्याची सुरुवात शेअर मार्केट उघडताच क्रॅश झाल्यानं नाराजीनं झाली. सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी म्हणजेच 1.3 टक्क्यांनी घसरून 76,580.57 अंकांवर व्यवहार करत होता.
मुंबई: नव्या वर्षाच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला रुपयाचा नकोसा विक्रम पाहायला मिळाला. रुपया सर्वात जास्त पैशांनी घसरला आणि डॉलरला पुन्हा एकदा मजबुती आली आहे. याचा परिणाम आशियातील शेअर मार्केटवरही झाला आहे. रुपयाचं मूल्य 23 पैशांनी कमी झालं आहे. 1 डॉलरचं मूल्य 86.27 रुपयांवर गेलं आहे. त्यामुळे ज्यांनी पैसे गुंतवले त्यांचं टेन्शन वाढलं आहे. मार्केट करेक्शन होणार की नाही याचीही एक भीती निर्माण झाली आहे.
आठवड्याची सुरुवात शेअर मार्केट उघडताच क्रॅश झाल्यानं नाराजीनं झाली. सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी म्हणजेच 1.3 टक्क्यांनी घसरून 76,580.57 अंकांवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टी 246.35 अंकांनी म्हणजेच 1.05 टक्क्यांनी घसरून 23,185.15 पातळीवर व्यवहार करत होतं. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये जो बलल तयार करण्यात आला होता तो फुटल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
गुंतवणूकदारांचं लक्ष आता बजेटवर आहे. जसं टॉनिक शरीरावर काम करतं तसंच शेअर मार्केटसाठी बजेट टॉनिक ठरू शकतं. मोदी सरकार आणि निर्मला सीतारमण बजेटमधून कोणत्या घोषणा करणार याकडे लक्ष लागलं आहे. आशियातील मार्केटवर त्याचा मोठा परिणाम होतो. त्यादरम्यान मार्केट रिकव्हर होण्याची संधी असल्याचंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
अनुज सिंघल यांनी बँक निफ्टी देखील लाल रंगात व्यवहार करत आहे, सध्या इथे गुंतवणूक करण्यासाठी उतावळे होऊ नका असा सल्ला दिला आहे. ज्यांनी स्टॉक्स घेतलेत त्यांनी होल्ड करा. इंट्राडे करणाऱ्यांनी विशेषत: ही गोष्ट लक्षात ठेवावी की बँकिंग सेक्टरकडे जाऊ नये. क्रूडच्या किंमतींवरही मोठा परिणाम झाला आहे. त्याचा इम्पॅक्टही शेअर मार्केटवर दिसत आहे.
advertisement
सोमवारी Zomato 2%, Asian Paints (1.70%), Tata Motors (1.50%), Adani Ports (1.40%), HDFC Bank (1.40%), Reliance (1.20%) टक्क्यांनी शेअर्स घसरले आहेत. मिडकॅप कंपन्यांमध्ये AWL Share (6.79%), Kalyan Jewellers Share (5.16%) आणि RVNL Share (4.55%) शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. 1941 कंपन्यांचे शेअर्स लाला रंगात व्यवहार करत आहेत. त्यामुळे दुसऱ्या सत्रातल्या मूडवर गुंतवणूकदारांचं लक्ष असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 13, 2025 10:21 AM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: रुपया गडगडला, सेन्सेक्स-निफ्टी क्रॅश, या शेअर्सला सर्वात जास्त फटका