शिक्षक होण्याचं स्वप्न अधुरं, ‘तो’ चहावाला बनला अन् भावाला ‘साहेब’ केला, प्रेरणादायी कहाणी

Last Updated:

Inspiring Story: सध्या उच्च शिक्षण घेऊनही नोकरी न मिळाल्याने काहीजण खचतात. परंतु, पेनुरच्या तरुणाने चहाचा व्यवसाय सुरू केला आणि भावाचं स्वप्न साकार केलं.

+
शिक्षक

शिक्षक होण्याचं स्वप्न अधुरं, ‘तो’ चहावाला बनला अन् भावाला ‘साहेब’ केला, प्रेरणादायी कहाणी

सोलापूर – ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे...’ ही म्हण आपण सर्वांनी ऐकली असेल. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील पेनुर गावात राहणारे उच्चशिक्षित शिवाजी गोडसे हे होय. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने शिवाजी यांनी चहा विक्रीचा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या चहा विक्रीच्या व्यवसायातून महिन्याला एक लाख रुपयांची उलाढाल करत आहे. तर याच चहा विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी धाकट्या भावाला पोलीस देखील बनवले आहे. लोकल18 च्या माध्यमातून हीच प्रेरणादायी कहाणी पाहुया.
पेनुर गावात राहणाऱ्या शिवाजी गोडसे यांचे शिक्षण बीएड, डी.एड पर्यंत झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिवाजी यांनी नोकरीचा शोध घेतला पण कुठेही नोकरी मिळाली नाही. एका मित्राने त्यांना गुळाचा चहा विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करायचा सल्ला दिला. सोलापूर-पंढरपूर महामार्गावरील पेनुर गावाजवळ दीड लाख रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी ‘आमदार गुळाचा चहा’ या नावाने चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
सुरुवातीला अडचणी
सुरुवातीच्या 5 ते 6 महिने चहाचा व्यवसाय करत असताना खूप अडचणी आल्या. पण खचून न जाता शिवाजी यांनी तो व्यवसाय तसाच सुरू ठेवला. आज शिवाजी गोडसे यांचा चहा विक्रीचा व्यवसाय उत्तम चालत असून दिवसाला जवळपास 400 कप चहा विक्री होत आहे. तर या व्यवसायातून ते महिन्याला एक लाख रुपयांची उलाढाल करत आहे.
advertisement
धाकट्या भावाला बनवलं पोलीस
उच्चशिक्षित तरुण शिवाजी गोडसे यांच्या धाकट्या भावाने पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. शिवाजी यांनी चहा विकून त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले. धाकट्या भावाला भरतीसाठी महिन्याला 5 हजार रुपये देत होते. मागील वर्षी शिवाजी गोडसे यांच्या धाकट्या भावाची ठाणे शहर पोलीस दलात निवड झाली असून एक वर्ष पूर्ण झाले आहे.
advertisement
दरम्यान, नोकरी मिळत नसेल तर तरुणांनी न लाजता स्वतःचा व्यवसाय करावा. आपण पाहिलेले व घरच्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण या मार्गाने देखील पूर्ण करता येईल, असा असा सल्ला शिवाजी गोडसे यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
शिक्षक होण्याचं स्वप्न अधुरं, ‘तो’ चहावाला बनला अन् भावाला ‘साहेब’ केला, प्रेरणादायी कहाणी
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement