Stock Market Crash: कोरोना पुन्हा आला? काही तासांत 9 लाख कोटी रुपये बुडाले; शेअर बाजार कोसळण्याची 4 कारणे
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Stock Market Crash: 24 तासांत कोविड-19 च्या 614 नवीन रुग्णांनी केवळ लोकांनाच नाही तर शेअर बाजारालाही घाबरवले आहे. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली, त्यामुळे गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
मुंबई, 20 डिसेंबर : कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. याचा परिणाम थेट शेअर मार्केटवरही झाला. बुधवारी काही तासांच्या कालावधीत शेअर बाजारात विक्रमी वाढ आणि विक्रमी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स-निफ्टीने सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर मोठी घसरण झाली. या मोठ्या घसरणीचे कारण दीर्घ काळानंतर कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ असल्याचे मानले जात आहे. 24 तासांत कोविड-19 च्या 614 नवीन रुग्णांनी केवळ लोकांनाच नाही तर शेअर बाजारालाही घाबरवले आहे. त्याच वेळी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मोठी रक्कम काढून घेतली. दरम्यान, बुधवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 9.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
20 डिसेंबरला, टॉप 30 शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स 931 अंकांनी किंवा 1.30 टक्क्यांनी घसरून 70,506 वर बंद झाला, तर NSE बेंचमार्क 303 अंकांनी किंवा 1.41 टक्क्यांनी घसरून 21,150 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 30 शेअर्स घसरले, तर ऑटो, मेटल, बँक निफ्टी आणि सेवांसह जवळपास सर्वच क्षेत्रांत विक्री दिसून आली. या मोठ्या घसरणीमुळे बीएसई एम-कॅपचे सुमारे 9.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सेन्सेक्समधील 3,921 शेअर्सपैकी 3,178 शेअर्स घसरले आणि 657 शेअर्स वाढले, तर 86 स्टॉक अपरिवर्तित राहिले.
advertisement
शेअर बाजार का कोसळला?
24 तासांत, कोविड-19 नवीन प्रकाराची 614 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे शेअर बाजारात घबराटीचे वातावरण पसरलं. त्याच वेळी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 600 कोटींहून अधिक रक्कम काढून घेतली, त्यामुळे शेअर्समध्ये वेगाने नफा बुकिंग सुरू झाले. तर देशांतर्गत संस्थांनी सुमारे 294 कोटी रुपयांची खरेदी केली. याशिवाय बँका, मेटल आणि वाहन स्टॉक्समध्ये सर्वाधिक घसरण झाल्याने शेअर बाजार दबावाखाली आला.
advertisement
शेअर बाजार कोसळण्याची चार प्रमुख कारणे
24 तासांत कोविड-19 चे 600 हून अधिक नवीन रुग्ण.
विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 600 कोटी रुपये काढून घेतले.
बँक, मेटल आणि वाहन क्षेत्रात मोठी घसरण.
वाढत्या बाजारात सतत होणारी प्रॉफिट बुकींग हेही कारण होते.
advertisement
9.1 लाख कोटी रुपये बुडाले
बीएसई एम-कॅपनुसार, मागील सत्रात नोंदवलेल्या 359.11 लाख कोटींच्या मूल्यांकनाच्या तुलनेत गुंतवणूकदारांची संपत्ती 9.11 लाख कोटी रुपयांनी घसरून 350.01 लाख कोटी रुपयांवर आली. रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय आणि एनटीपीसी या आघाडीच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील या घसरणीमुळे बीएसईवरील 28 स्टॉक्सने 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली.
advertisement
आधी विक्रमी वाढ..
ही वाढ बुधवारी दुपारपर्यंत सुरूच होती, हे विशेष. सुरुवातीच्या व्यापारात, सेन्सेक्सने जवळपास 450 अंकांची वाढ केली आणि 71,913 ही ऑल टाइम उच्च पातळी गाठली. सुरुवातीच्या व्यवहारात 21,593 चा स्तर गाठलेल्या निफ्टीचीही अशीच स्थिती होती. मात्र, नंतर दोन्हीमध्ये विक्रमी घसरण नोंदवण्यात आली.
Location :
First Published :
December 21, 2023 12:23 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Stock Market Crash: कोरोना पुन्हा आला? काही तासांत 9 लाख कोटी रुपये बुडाले; शेअर बाजार कोसळण्याची 4 कारणे