Success Story : वयाच्या 58 व्या झाल्या उद्योजीका, मेधा देशपांडे यांचा फराळ आता परदेशातही प्रसिद्ध
- Published by:Devika Shinde
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
मेधा देशपांडे 58 व्या वयातही त्यांच्या कार्यक्षमतेने आणि जिद्देने सर्वांना प्रेरित करतात.
साक्षी पाटील-प्रतिनीधी, ठाणे : वय कितीही असलं तरी माणसाची जिद्द महत्त्वाची असते, हेच सिद्ध केलं आहे मेधा देशपांडे यांनी. मेधा गेली 30-35 वर्षे दिवाळीत फराळाचा व्यवसाय करतात, आणि त्यांच्या या व्यवसायाने ठाण्यात लोकप्रियतेची उच्च शिखर गाठली आहे. या व्यवसायात फक्त ठाण्यातच नाही, तर परदेशातही त्यांच्या फराळाला चांगली मागणी आहे.
मेधा देशपांडे 58 व्या वयातही त्यांच्या कार्यक्षमतेने आणि जिद्देने सर्वांना प्रेरित करतात. त्यांच्या विविध प्रकारच्या फराळात भाजणी चकली, नाचणी चकली, पोह्याचा चिवडा, बटाटा चिवडा, गोड व तिखट शंकरपाळी, बेक शंकरपाळी, कडबोळे, आणि चिरोटे यांचा समावेश आहे. या पदार्थांची किंमत फक्त 200 ते 250 रुपयांपासून सुरू होते.
त्यांच्या इथे साजूक तुपातले लाडू देखील मिळतात, ज्यांची किंमत फक्त 36 रुपयांपासून सुरू होते. मेधा यांच्या खासियत म्हणजे जर तुम्हाला फराळ सुंदर पद्धतीने सजवून हवा असेल, तर ते त्यासाठीदेखील तयार असतात. यामुळे तुम्ही हे फराळ कोणा विशेष व्यक्तीला शुभेच्छा म्हणून देऊ शकता.
advertisement
"यावर्षी माझा फराळ अमेरिका, लंडन, व्हिएतनाम, सौदी अरेबिया अशा अनेक देशांमध्ये गेला आहे. तिथून मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यामुळेच मी उत्साहाने हा व्यवसाय चालवते," असे मेधा म्हणतात.
त्यांचा व्यवसाय दिवाळीच्या काळातच नाही, तर इतर सणांसाठीही वेगवेगळ्या पदार्थांची ऑर्डर घेतात. त्यामुळे ठाणेकरांना मेधा देशपांडे यांचा व्यवसाय खूप आवडतो.
तुम्ही अजूनही फराळ बनवला नसेल, तर मेधाज किचनमधून त्वरित फराळाची ऑर्डर करा आणि सणाची मजा वाढवा!
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 29, 2024 10:22 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : वयाच्या 58 व्या झाल्या उद्योजीका, मेधा देशपांडे यांचा फराळ आता परदेशातही प्रसिद्ध