Success Story : अपघातात हात–पायांना गंभीर दुखापत, पण हार नाही मानली, व्हीलचेअरवरून सुजय यांनी उभारली 2 कोटींची कंपनी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
सलग दोन ते तीन स्टार्टअपमध्ये अपयश येऊन सुद्धा हार न मानता, पुण्यातील सुजय पाचंगे यांनी तब्बल दोन कोटींची कंपनी उभारली.
पुणे: सलग दोन ते तीन स्टार्टअपमध्ये अपयश येऊन सुद्धा हार न मानता, पुण्यातील सुजय पाचंगे यांनी तब्बल दोन कोटींची कंपनी उभारली आहे. सुजय पाचंगे यांचा हा प्रवास अतिशय खडतर होता. वयाच्या 21व्या वर्षी झालेल्या अपघातात त्यांच्या दोन्ही हात–पायांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना कायमस्वरूपी व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला.
या अपघातानंतर सुजय यांनी जवळपास दोन वर्षे डिप्रेशनचा सामना केला. परंतु हार न मानता त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. शेवटी त्यांनी शेतीशी संबंधित पोशिंदा नावाने कंपनी सुरू केली आणि आज या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल दोन कोटींवर पोहोचला आहे. त्याच्या या प्रवासाविषयी सुजय पाचंगे यांनी लोकल 18 ला दिली आहे.
स्वबळावर उभी केली दोन कोटींची कंपनी
2022 साली सुजय पाचंगे यांनी पोशिंदा ही शेतीशी संबंधित कंपनी उभारली. पोशिंदा कंपनीत ऑर्गॅनिक वेस्टपासून सेंद्रिय खत तयार केलं जातं. त्यांनी बनवलेल्या या खतामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. त्यांच्या या पोशिंदा स्टार्टअपला अनेक अवॉर्डद्वारे सन्मानित करण्यात आलं आहे.
advertisement
Success Story : फक्त 14 गुंठ्यात केली लागवड, 45 दिवसात मिळणार लाखात उत्पन्न, शेतकऱ्यानं करून दाखवलं!
व्हीलचेअरवर असूनही, सुजय यांनी जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर फक्त पोशिंदा नव्हे तर वरद ग्रुप ऑफ कंपनीसुद्धा उभी केली आहे. वरद कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 20 कोटींपर्यंत पोहोचला असून, या दोन्ही स्टार्टअपमुळे सुजय यांनी हजारो हातांना रोजगार दिला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 20, 2025 4:47 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : अपघातात हात–पायांना गंभीर दुखापत, पण हार नाही मानली, व्हीलचेअरवरून सुजय यांनी उभारली 2 कोटींची कंपनी

