Success Story : फक्त 14 गुंठ्यात केली लागवड, 45 दिवसात मिळणार लाखात उत्पन्न, शेतकऱ्यानं करून दाखवलं!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
राजाराम कदम यांनी 14 गुंठ्यात दोडक्याची लागवड केली आहे. सध्या दोडक्याला भाव चांगला मिळत असून दोडका विक्रीतून राजाराम कदम यांना 45 दिवसांत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न शेतकरी राजाराम कदम यांना मिळणार आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील येवती गावात राहणाऱ्या राजाराम बजरंग कदम यांनी 14 गुंठ्यात दोडक्याची लागवड केली आहे. सध्या दोडक्याला भाव चांगला मिळत असून दोडका विक्रीतून राजाराम कदम यांना 45 दिवसांत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न शेतकरी राजाराम कदम यांना मिळणार आहे.
मोहोळ तालुक्यातील येवती गावात राहणाऱ्या राजाराम कदम यांनी 45 दिवसांपूर्वी 14 गुंठ्यामध्ये रजनीश व्हरायटीच्या दोडक्याची लागवड केली होती. दोडक्याची लागवड करण्याअगोदर जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करून दोडक्याच्या बियांचे दोन फुटांवर अंतरावर ठेवून दोडक्याच्या बियांची लागवड केली, तर बेडमधील पाच फुटाचे अंतर राजाराम यांनी ठेवले.
advertisement
दोडक्यावर कोणताही रोग येऊ नये यासाठी एक दिवसाआड फवारणी केली. लागवडीपासून 45 दिवसानंतर दोडका तोडण्यास सुरुवात होते. एकदा दोडक्याची लागवड झाल्यास दोन दिवसाआड दोडक्याची तोडणी करावी लागते. सध्या दोडक्याला बाजारात चांगला भाव मिळत असून एका व्यापाऱ्याने जाग्यावरून पन्नास रुपये किलो दराने राजाराम कदम यांच्याकडून दोडका खरेदी केला आहे. दोडका विक्रीतून जवळपास 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार असल्याची माहिती राजाराम कदम यांनी दिली.
advertisement
दोडक्याच्या वाढीवर विशेष लक्ष देऊन राजाराम कदम यांनी रजनीश या व्हरायटीच्या दोडक्याची लागवड केली आहे. जे कमी वेळेत कमी खर्चात अधिक उत्पन्न देतो. शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करून योग्य प्रकारचे भाजीपाला पीक घेतल्यास कमी गुंठ्यातही अधिकाधिक उत्पन्न मिळवू शकतो, असा सल्ला शेतकरी राजाराम कदम यांनी दिला आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 20, 2025 3:33 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : फक्त 14 गुंठ्यात केली लागवड, 45 दिवसात मिळणार लाखात उत्पन्न, शेतकऱ्यानं करून दाखवलं!

