Share Marketचा सर्वात मोठा खेळाडू; रोज करतो 1,900 व्यवहार; गुंतवतो 1.6 लाख कोटी, Net Profit पाहून सर्वजण हैराण

Last Updated:

Stock Market: गुरुग्रामस्थित ग्रेविटॉन रिसर्च या हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग कंपनीने इंट्राडेमध्ये तब्बल 1.6 लाख कोटी रुपयांचा दांव लावत शेअर बाजारात खळबळ उडवली आहे. बाजाराच्या सुमारे 25 टक्के व्यवहारांवर या एकाच कंपनीचा प्रभाव असल्याचे आकडे समोर आले आहेत.

News18
News18
मुंबई: शेअर बाजारात रोज कोट्यवधी गुंतवणूकदार व्यवहार करत असतात, पण गुरुग्राममधील एक कंपनी अशी आहे जी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये थेट 1.6 लाख कोटी रुपयांचा दाव लावते. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही माहिती खरी आहे. ही कंपनी दररोज सुमारे 1,900 इंट्राडे व्यवहार करते आणि त्यातील एकही व्यवहार 85 कोटी रुपयांपेक्षा कमी नसतो. 2025 या वर्षात या कंपनीचा इंट्राडे व्यवहारांचा एकूण आकडा 1.6 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच इंट्राडे ट्रेडिंगमध्ये बाजारात लागणाऱ्या एकूण दाव्यांपैकी जवळपास 25 टक्के दाव ही एकटी कंपनी लावत आहे.
advertisement
ही गुरुग्रामस्थित हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग कंपनी असून शेअर बाजारातील मोठी खेळाडू म्हणून ती पुढे आली आहे. या कंपनीचे नाव ग्रेविटॉन रिसर्च (Graviton Research) आहे. ही कंपनी इंट्राडे कॅश मार्केटमध्ये किमान 1,900 मोठे व्यवहार करते आणि त्यांची एकूण किंमत 1.6 लाख कोटी रुपयांपर्यंत जाते. हे आकडे समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इतका मोठा दाव ही कंपनी नेमका कसा आणि का लावत आहे?
advertisement
85 कोटींपेक्षा कमी व्यवहारच नाही
ग्रेविटॉनचा सरासरी ट्रेड साइज तब्बल 85 कोटी रुपये आहे. कंपनीच्या एकूण 1,900 बल्क डील्सपैकी 458 व्यवहारांमध्ये तर 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गुंतवण्यात आली आहे. मात्र हे आकडे प्रत्यक्ष ट्रेडिंग व्हॉल्युमपेक्षा कमीच आहेत, कारण हे फक्त ते व्यवहार आहेत ज्यांची माहिती एक्सचेंजला देणे बंधनकारक असते. एक्सचेंजच्या नियमांनुसार एखाद्या लिस्टेड कंपनीच्या एका सत्रातील एकूण व्यवहाराच्या 0.50 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या डील्सची माहिती जाहीर करावी लागते.
advertisement
मार्केट शेअर झपाट्याने वाढतोय
ग्रेविटॉनचा बाजारातील वाटा वेगाने वाढत आहे. 2025 मध्ये एनएसईवर या कंपनीच्या 17,500 बल्क डील्स नोंदल्या गेल्या, जे एकूण अशा व्यवहारांपैकी सुमारे 10 टक्के आहेत. किमतीच्या दृष्टीने पाहिले तर एक्सचेंजवरील एकूण बल्क डील्स 6.8 लाख कोटी रुपयांच्या होत्या, त्यापैकी जवळपास 24 टक्के वाटा एकट्या ग्रेविटॉनचा होता. हे आकडे महत्त्वाचे आहेत, कारण बाजारात सध्या सुमारे 12 हजार परदेशी फंड आणि हजारो प्रोप्रायटरी ट्रेडर्स मोठ्या प्रमाणावर व्यवहार करतात.
advertisement
कुठल्या शेअर्समध्ये जास्त गुंतवणूक?
ग्रेविटॉन प्रामुख्याने मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये जास्त गुंतवणूक करते, तर लार्ज कॅप शेअर्समध्ये तिची हिस्सेदारी तुलनेने कमी आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, यामुळे दोन गोष्टी घडतात एकीकडे छोट्या शेअर्समध्ये लिक्विडिटी वाढते, पण दुसरीकडे त्यात मोठी चढ-उतार (वोलॅटिलिटी) निर्माण होते. याचा परिणाम छोट्या गुंतवणूकदारांवर होऊ शकतो.
advertisement
नफा पाहून धक्का बसेल
बाजार विश्लेषकांनी ग्रेविटॉनच्या व्यवहारांचे मूल्यमापन दोन निकषांवर केले. यशाचा दर आणि नफा. 100 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या 458 व्यवहारांपैकी 90 टक्के व्यवहारांत कंपनीला नफा झाला आहे. याच्या तुलनेत रिटेल गुंतवणूकदारांचा यशाचा दर फक्त 30 ते 50 टक्के असतो. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या मोठ्या व्यवहारांनंतरही कंपनीने इंट्राडेमध्ये केवळ 24 कोटी रुपयांचा नफा कमावल्याचे दिसते. काहींचा दावा आहे की फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये कंपनी सक्रिय असेल, तर प्रत्यक्ष नफा यापेक्षा जास्त असू शकतो.
advertisement
इनकम टॅक्सची कारवाई
कंपनीच्या प्रचंड व्यवहारांकडे नियामक संस्थांचे लक्ष गेले असून, गेल्या ऑक्टोबरमध्ये आयकर विभागाने ग्रेविटॉनच्या कार्यालयावर छापा टाकला होता. मात्र कंपनीचे म्हणणे आहे की ती सर्व नियमांचे पालन करते. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीचा नफा 67 टक्क्यांनी वाढला असून, शुद्ध नफा 1,010 कोटी रुपयांहून अधिक होता. मनीकंट्रोलच्या 9 सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार ग्रेविटॉन ही सेबीच्या रडारवर असलेल्या टॉप 10 ट्रेडर्सपैकी एक आहे. या यादीत अमेरिकेची जेन स्ट्रीट ही ट्रेडिंग फर्मही आहे. मात्र सध्या सेबीने कोणतीही औपचारिक चौकशी सुरू केलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Share Marketचा सर्वात मोठा खेळाडू; रोज करतो 1,900 व्यवहार; गुंतवतो 1.6 लाख कोटी, Net Profit पाहून सर्वजण हैराण
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement