Union Budget 2025 : हा अन्यायकारक अर्थसंकल्प, जालनाकर थेट बोलले, VIDEO
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य जनतेला काय अपेक्षा होत्या. सर्वसामान्यांच्या या अपेक्षा अर्थसंकल्पातून पूर्ण झाल्यात का? याबाबत लोकल १ ८ च्या प्रतिनिधीने जाणून घेतलं पाहुयात.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. नोकरदारांना मोठं गिफ्ट या अर्थसंकल्पामधून मिळालं असून आता १ २ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ३ लाख रुपयांपर्यंत असलेली कर्ज मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याबरोबरच अनेक महत्त्वाचे निर्णय अर्थसंकल्पातून घेण्यात आले आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य जनतेला काय अपेक्षा होत्या. सर्वसामान्यांच्या या अपेक्षा अर्थसंकल्पातून पूर्ण झाल्यात का? याबाबत लोकल १ ८ च्या प्रतिनिधीने जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प हा देशाला नवी दिशा देणार आहे. सर्व घटकांचा विचार करून अतिशय समतोल असा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे. देशाच्या विकासाचा पाया या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून रचण्यात आला आहे. त्यामुळे मी या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो, असं जालना शहरातील नागरिक रामदास कुलकर्णी यांनी सांगितलं.
advertisement
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प वरकरणी सकारात्मक वाटत असला तरी देशातील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणजेच शिक्षण क्षेत्र यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतुदीची अपेक्षा होती. ही अपेक्षा फोल ठरली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन शिक्षण धोरण लागू करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रासाठी तोकडी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यूपीए सरकारच्या तुलनेत एक टक्का कमी तरतूद शिक्षण क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. ही बाब निराशा जनक असल्याचं राजेभाऊ मगर यांनी सांगितलं.
advertisement
सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेता येणार आहे ही समाधानकारक बाब आहे. परंतु आरोग्याच्या बाबतीत अर्थसंकल्पामध्ये दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य ही प्रत्येक जनसामान्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे आरोग्यावर भरीव निधीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये होणे गरजेचे होतं ते झालेले नाही, अशी भावना संदीप इंगोले यांनी व्यक्त केली.
advertisement
केंद्र सरकारने टॅक्स स्लॅबमध्ये केलेली बदल स्वागत करणे योग्य आहे. १ २ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न सरकारने टॅक्स फ्री केले आहे याचा लाभ देशातील लाखो लोकांना होईल. त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील टॅक्स लाभमध्ये केलेले बदल ही अतिशय स्वागत आहे पाऊल असल्याचं ईश्वर वाघ यांनी सांगितलं.
advertisement
view comments
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 01, 2025 6:11 PM IST









