Budget 2025: 1 फेब्रुवारीपासून सोने महागणार का? बजेटमध्ये होऊ शकते विशेष घोषणा, आत्ताच खरेदी करायचे की नाही?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Budget 2025 And Gold Price: एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या किंमती वाढतील की कमी होतील याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
नवी दिल्ली : सोन्याच्या किमतीत गेल्या दोन आठवड्यांपासून सतत वाढ होत आहे. शुक्रवारी राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढून 82 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोन्याच्या किमतीत ही तेजी अशीच कायम राहू शकते. एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार असून त्यानंतर सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते.
आगामी अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. बजेटमध्ये सोन्यावर कस्टम ड्युटी वाढवू शकते. तसे झाले तर सोन्याची आयात महाग होईल आणि त्यामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात. गेल्या वर्षी कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणण्यात आली होती, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली होती.
कुंभ मेळ्यातील IIT बाबांना बाहेर काढले, अखाड्याने म्हटले, संन्यासामध्ये...
मागील अर्थसंकल्पात सरकारने महागाईच्या काळात किंमती स्थिर ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सोन्यावर कस्टम ड्युटी कमी केली होती. मात्र, त्यामुळे खप वाढल्याने व्यापार तूट (ट्रेड डेफिसिट) वाढल्याची चिंता निर्माण झाली. यामुळे तज्ज्ञांच्या मते, सरकार या तूट थांबवण्यासाठी अर्थसंकल्पात सोन्यावर कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा करू शकते.
advertisement
सोनं खरेदी करण्याचा योग्य वेळ?
जर सरकारने सोन्यावर कस्टम ड्युटी वाढवली तर सोनं अधिक महाग होईल. त्यामुळे तज्ज्ञांनी असा सल्ला दिला आहे की, एक फेब्रुवारीपूर्वी सोनं खरेदी करणे योग्य ठरेल. मात्र, जर कस्टम ड्युटी वाढवली गेली नाही, तर सोन्याच्या किमतींमध्ये फारशी मोठी वाढ होणार नाही.
advertisement
सरकार अर्थसंकल्पात उत्पादनाला चालना देण्यासाठी काही वस्तूंच्या कच्च्या मालावर कस्टम ड्युटी कमी करू शकते. यामध्ये वैद्यकीय उपकरणे, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फुटवेअर यांचा समावेश आहे. असे झाल्यास या उद्योगांना कच्चा माल स्वस्त दरात मिळेल आणि त्यामुळे या वस्तूंच्या किंमतीतही कपात होईल. याचा फायदा सामान्य लोकांना मिळू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 19, 2025 7:21 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Budget 2025: 1 फेब्रुवारीपासून सोने महागणार का? बजेटमध्ये होऊ शकते विशेष घोषणा, आत्ताच खरेदी करायचे की नाही?


