Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर रविवारी 4 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; कुठून कुठपर्यंत, काय असणार वेळ? जाणून घ्या
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर चार तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. कोणत्या मार्गावर असेल, जाणून घ्या
पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही रविवारच्या दिवशी प्रवास करणार असाल तर एकदा घरातून निघण्यापूर्वी एकदा आवश्य बातमी वाचा. रविवारी अर्थात 15 फेब्रुवारी 2026 रोजी पश्चिम रेल्वेवर चार तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. बोरिवली ते राम मंदिर या स्थानकादरम्यान चार तासांचा जम्बो मॅगाब्लॉक असणार आहे. हा जम्बो मॅगाब्लॉक कोणत्या काळात असणार आहे? कोणकोणत्या मार्गावरील लोकल्सला या मेगाब्लॉकचा विशेष फटका बसणार आहे, जाणून घेऊया...
केव्हा असणार मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवरील जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली ते राम मंदिर या स्थानकादरम्यान रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा मेगब्लॉक घेतला जाणार आहे. सिग्नल यंत्रणेत दुरूस्ती, रेल्वे ट्रॅकमधील दुरुस्ती आणि ओव्हरहेड वायरचे देखील महत्त्वाचे काम करण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पाचव्या मार्गिकेवर अप जलद मार्गिकेवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मेगाब्लॉकच्या काळामध्ये सर्व लोकल इतर मार्गिकांवरून चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो घरातून निघण्याआधी एकदा मेगाब्लॉकच्या वेळापत्रकावर नजर टाकूनच घराबाहेर पडाल.
advertisement
पर्यायी मार्ग
पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व अप जलद मार्गावरील लोकल बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान अप स्लो सहाव्या मार्गिकेवर बोरिवली आणि अंधेरी स्थानकादरम्यान धावणार आहेत. त्यानंतर सर्व पाचव्या मार्गिकेवरील लोकल अंधेरी आणि बोरिवली स्थानकानंतर डाऊन फास्ट मार्गावर धावतील. ब्लॉकच्या काळात, काही अप आणि डाऊन मार्गावरील उपनगरीय लोकलसेवा रद्द केल्या जाणार आहेत. याशिवाय, हार्बर मार्गावरील अंधेरी आणि बोरिवलीच्या लोकल सेवा फक्त गोरेगावपर्यंतच धावणार आहेत.
advertisement
सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांवर स्टेशन मास्टर्सकडून प्रवाशांना सविस्तर माहिती वारंवार दिली जाणार आहे. पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांना विनंती करण्यात आले आहे की, प्रवाशांनी लोकलच्या बदलांच्या अपडेट्सची नोंद घ्यावी आणि गैरसोय टाळण्यासाठी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नायगाव रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज उद्यापासून म्हणजेच 14 फेब्रुवारी 2026 पासून पुढच्या दीड महिन्यासाठी प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. हा ब्रिज प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून सुरू होतो, जो पुढे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि 3 ला पुढे जोडतो.
advertisement
स्टेशनवरील पादचारी पूल आणि प्लॅटफॉर्मच्या बांधकाम आणि विस्ताराच्या कामामुळे हे बंद केला जाणार आहे. बंद कालावधीत, प्रवासी स्टेशनवरील उर्वरित तीन पादचारी पुलांचा वापर करू शकतात. प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरून ये- जा करण्यासाठी सबवे सुविधा देखील उपलब्ध राहील. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचा आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे . नायगाव स्थानकावर प्रवाशांच्या सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांचा हा एक भाग आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 7:40 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर रविवारी 4 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; कुठून कुठपर्यंत, काय असणार वेळ? जाणून घ्या








