advertisement

आदित्य ठाकरेंची सावलीसारखी साथ, पुण्याच्या सुपुत्राचा ऑन ड्युटी मृत्यू

Last Updated:

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सुशील मोहन भांडे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं.

mumbai police
mumbai police
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले आणि आपल्या शांत व संयमी स्वभावासाठी ओळखले जाणारे पोलीस कर्मचारी सुशील मोहन भांडे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलासह त्यांच्या मूळ गावी, भोर तालुक्यातील भोंगवली हळहळ व्यक्त केली जात आहे.

आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक म्हणून बजावली सेवा

सुशील भांडे हे सध्या मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. विशेष म्हणजे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे बॉडीगार्ड म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिलं होतं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मुंबई पोलीस दलातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement

भोंगवली गावात शोककळा

सुशील भांडे यांच्या निधनाचं वृत्त समजताच त्यांच्या मूळ गावी, भोर तालुक्यातील भोंगवली येथे शोककळा पसरली आहे. अत्यंत तरुण वयात आणि कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने एका उमद्या सहकाऱ्याला गमावल्याची भावना त्यांच्या मित्रपरिवाराने व्यक्त केली.

शासकीय इतमामात अखेरचा निरोप

भांडे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच भोंगवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुंबई पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. शासकीय इतमामात आणि साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. याप्रसंगी परिसरातील नागरिक, पोलीस अधिकारी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
आदित्य ठाकरेंची सावलीसारखी साथ, पुण्याच्या सुपुत्राचा ऑन ड्युटी मृत्यू
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement