advertisement

Mumbai Crime: सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून चोरी, सीसीटीव्हीमुळे पितळ उघड पडलं; आरोपीला अटक

Last Updated:

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील एका कर्मचाऱ्याने मंदिरातल्या दानपेटीवर डल्ला मारला आहे. मुंबई पोलिसांनी आता आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

News18
News18

मुंबई: अनेक सेलिब्रिटींसह क्रिकेटर्स आणि दिग्गज राजकारण्यांचे प्रभादेवीतील सिद्धिविनायक गणपती श्रद्धास्थान आहे. या आराध्य दैवत असलेल्या मंदिरामध्ये दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. याच मंदिरातील एका कर्मचाऱ्याने मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला आहे. त्याने थेट मंदिराच्या दानपेटीवरच हात साफ केला आहे. सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचाऱ्याने दानपेटीतून पैसे चोरल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आले आहे. त्यानंतर दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

advertisement
लोअर परळमध्ये राहणाऱ्या आणि सिद्धिविनायक गणपती मंदिरातील कर्मचारी राजेंद्र पेंडुरकर (वय 57) या आरोपीने चोरी केल्याचा खुलासा मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमधून झाला आहे. त्याने मंदिराच्या दानपेटीतून 10,000 रुपये चोरल्याचा आरोप आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी या गुन्ह्यात आणखी पाच कर्मचारी सामील असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. मंदिरामध्ये चोरी झाल्याची माहिती मंदिरातील कर्मचारी बिना पाटील यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली. 
advertisement
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मंदिरामध्ये चोरी झाल्यानंतर लगेचच सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना उघडकीस आले की, राजेंद्रने दानपेटी आणि त्यातील पैसे चोरले आहेत. मंदिरातील दानपेटी आणि त्यातील पैसे चोरीला गेल्याची माहिती बिना पाटील यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर, ट्रस्टच्या सदस्यांनी गेल्या आठ ते दहा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी दानपेट्यांमधून वारंवार पैसे चोरत असल्याचे आढळून आले. घटनेनंतर तात्काळ मंदिर प्रशासनाने आरोपी विरोधात दादर पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली आहे.
advertisement
मंदिर ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच दादर पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवल्यानंतर लगेचच शुक्रवारी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली. त्याला तात्काळ न्यायालयात हजरही करण्यात आले, आरोपीला रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपासादरम्यान, आरोपीने पोलिसांना सांगितले की त्याने मंदिराच्या दानपेटीतून 10,000 रुपये चोरल्याची माहिती दिली आहे. शिवाय, तो वारंवार मंदिराच्या दानपेटीतून पैसे चोरत असल्यामुळे, एकूण रक्कम जास्त असण्याची शक्यता पोलिसांना आहे, ज्याचा सध्या तपास सुरू आहे.
advertisement
ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपी पेंढुरकर सिद्धिविनायक गणपती मंदिरात कायमस्वरूपी कर्मचारी होता. मंदिराच्या आवारात विविध ठिकाणी दानपेट्या ठेवलेल्या आहेत. संध्याकाळी, कर्मचारी दानपेट्या दुसऱ्या मजल्यावर ठेवायचे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, आरोपी पेंढुरकरने इतर पाच कर्मचाऱ्यांसोबत त्या पेट्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन उलट्या केल्या.”
advertisement
त्यांनी पुढे सांगितले की, चोरीमध्ये सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. “आम्ही दोषी आढळलेल्यांना निलंबित करू. चोरीला गेलेली नेमकी रक्कम निश्चित करणे कठीण आहे, परंतु ही चोरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचे दिसते आणि आम्ही इतर पाच कर्मचाऱ्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. पोलिसांकडून सर्व आरोपींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल.”
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime: सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून चोरी, सीसीटीव्हीमुळे पितळ उघड पडलं; आरोपीला अटक
Next Article
Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
  • महाराष्ट्र केसरीचा विजेता मालामाल होणार

  • फॉर्च्युनर गाडीसह रोख बक्षीस मिळणार

  • मानाची गदा कोण पटकावणार?

View All
advertisement