Baba Siddique : 'माझा नाईलाज, पण कोणामुळे ही वेळ..' काँग्रेसची साथ सोडल्यानंतर बाबा सिद्दीकींची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Baba Siddique : काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडत राजीनामा जाहीर केला आहे.

काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी
काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी
मुंबई, (उदय जाधव, प्रतिनिधी) : मिलिंद देवरा यांच्यानंतर बाबा सिद्दीकी यांनीही पक्षाचा 'हात' सोडल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी यांनी पुढील वाटचालीबाबत अद्याप काही स्पष्ट केलं नाही. मात्र, ते अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
बाबा सिद्दीकी म्हणाले, मी इतकी वर्षे या परिवारात राहिलोय. या परिवारात होणाऱ्या घडामोडी संदर्भात मी इतके वर्ष बोललो, त्या माध्यमांवर सांगू शकत नाही. राजीनामा दिला आहे. मात्र, कारण न सांगितलेलं बरं अशी प्रतिक्रिया बाबा सिद्दीकी यांनी दिली. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींचा निर्णय त्यांनाच विचारा, असंही ते म्हणाले.
बाबा सिद्दीकी यांनी म्हटलं की, मी एक तरुण म्हणून काँग्रेसमध्ये आलो. ४८ वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. खूप काही आहे जे मला व्यक्त करायचं आहे. पण काही गोष्टी न सांगितलेल्याच चांगल्या. त्या सर्वांचे आभार जे या प्रवासाचा भाग राहिले असंही बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा देताना म्हटलंय.
advertisement
advertisement
अजित पवार कौतुकासारखेच : बाबा सिद्दकी
मी जिथे जाईन तिथे पक्षासोबत पीसी घेणार आहे. दहा तारखेला एक सभा होईल. माझ्याबरोबर असणारे लोकं त्यात येतील. अजित पवार हे कौतुकासारखेच आहेत. अजित पवार आपल्या सर्व लोकांकडे लक्ष ठेवतात, हे त्यांचं मोठेपणा आहे. आगे आगे देखो होता है क्या. माझा संबंध राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खर्गे यांच्या सोबत अनेक वर्षे राहिला आहे. मी पक्ष सोडताना कोणी कॉल केला हे सांगणं उचित नाही.
advertisement
मी हा निर्णय अचानक घेतलेला नाही. याबाबत मी वरिष्ठांना पंधरा-वीस दिवसापूर्वीच कळवले आहे. माझीदेखील मजबुरी आहे, त्यामुळे हा निर्णय घेतलाय. दुःख तर होतंय पण ते शोधा कोणामुळे मी हा निर्णय घेतला असंही सिद्दकी यांनी स्पष्ट केलं. मुंबई, महाराष्ट्र काँग्रेसमधील कुणा नेत्यावर नाराजी नाही. होर्डिंग्ज लागलेत म्हटल्यावर त्याप्रमाणे मी राष्ट्रवादीत चाललोय. कोणत्याही गोष्टीबाबत मला कमिटमेन्ट केलं नाही. काही नोटीसा वैगेरे मला आलेल्या नाहीत, असंही सिद्दकी यांनी शेवटी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Baba Siddique : 'माझा नाईलाज, पण कोणामुळे ही वेळ..' काँग्रेसची साथ सोडल्यानंतर बाबा सिद्दीकींची पहिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement