Success Story: आवडीला व्यवसायाची जोड; आयटीमध्ये नोकरी करत दिव्या वर्षाकाठी कमावतेय अडीच लाखांचे उत्पन्न
- Reported by:Namita Suryavanshi
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
शिक्षण, नोकरी आणि आवड यांचा समतोल साधत अनेक तरुण आज नव्या वाटा शोधत आहेत. त्याच प्रवाहात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिव्याने आपल्या आवडीला व्यावसायिक रूप देत स्वतःचा महाराष्ट्रीयन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला आहे.
मुंबई: शिक्षण, नोकरी आणि आवड यांचा समतोल साधत अनेक तरुण आज नव्या वाटा शोधत आहेत. त्याच प्रवाहात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिव्याने आपल्या आवडीला व्यावसायिक रूप देत स्वत:चा महाराष्ट्रीयन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला आहे. दिव्याने बीएससी आयटीमधून पदवी शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती आयटी क्षेत्रात नोकरी करत आहे. मात्र नोकरीपुरतीच मर्यादित न राहता, तिने आपल्या सर्जनशीलतेला संधी देत पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांच्या व्यवसायात पाऊल टाकले.
महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांना आधुनिक डिझाइनचा साज देत दिव्या वेगळा आणि आकर्षक लूक तयार करते. हे सर्व दागिने ती पूर्णपणे स्वतःच्या हाताने बनवते. दागिन्यांच्या निर्मितीसाठी ती जपानी पद्धतीचे साहित्य वापरत असल्यामुळे तिच्या ज्वेलरीला खास ओळख मिळत आहे. सकाळी ऑफिसची जबाबदारी पार पाडल्यानंतर घरी परतल्यावर दिव्या दागिन्यांचे काम करते. हे काम केल्याने दिवसभराचा ताण कमी होतो आणि आवड जोपासल्याचा आनंद मिळतो, असे ती सांगते. या प्रवासात कुटुंबाचा, विशेषतः आईचा, तिला सातत्याने पाठिंबा मिळत आहे.
advertisement
दिव्या विविध प्रदर्शनांमध्ये आणि एक्झिबिशनमध्ये सहभागी होत आपली ज्वेलरी ग्राहकांपर्यंत पोहोचवते. गेल्या वर्षभरापासून दिव्या हा ज्वेलरीचा बिझनेस करत असून यामधून तिला पार्ट- टाइम स्वरूपाचे उत्पन्न मिळत आहे. या ज्वेलरी व्यवसायातून दिव्याला वर्षाकाठी सुमारे अडीच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळत आहे. नोकरीसोबत स्वतःची आवड जपत आर्थिक स्वावलंबन साधणारी दिव्याची ही वाटचाल अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नोकरी सांभाळत बिझनेस करत असल्यामुळे दिव्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 3:29 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Success Story: आवडीला व्यवसायाची जोड; आयटीमध्ये नोकरी करत दिव्या वर्षाकाठी कमावतेय अडीच लाखांचे उत्पन्न









