BMC च्या पहिल्या यादीत ठाकरेंचा मराठीचा ठसा तर भाजपचं अमराठींना प्राधान्य,आकडेवारी पाहून बसेल धक्का
- Published by:Prachi Amale
Last Updated:
व्होट बँक जपली तरच विजयाचा मार्ग सोपा होणार आहे, हे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप उमेदवारांची यादी पाहिल्यावर लक्षात येतं.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत्या उमेदवारांचा सस्पेन्स अखेर संपू लागला आहे. . प्राण कंठाशी आणून वाट पाहाणाऱ्या इच्छुकांच्या हाती उमेदवारी अर्ज पडू लागलेत. राजकीय पक्षांच्या या याद्या म्हणजे मतपेढ्या मजबूत करण्याची कसरत आहेत हे स्पष्ट होतंय. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या 75 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. दुसरीकडे भाजपनंही 66 उमेदवार मैदानात उतरवलेत मुंबईचा महापौर मराठीच असणार हे ठाकरे आणि महायुतीनं ठासून सांगितलंय. त्यासाठी त्यांची जोरदार तयारीही सुरू झालीय. परिणामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता रंग भरायला सुरूवात झालीय. दुसरीकडे मराठी महापौर करण्यासाठी राजकीय पक्षांना व्होट बँकेवर भर दिल्याचं स्पष्ट होतंय. कारण व्होट बँक जपली तरच विजयाचा मार्ग सोपा होणार आहे, हे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप उमेदवारांची यादी पाहिल्यावर लक्षात येतं.
भाजपनं 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. त्या यादीत अमराठी उमेदवारांचा दबदबा पाहायला मिळतोय. भाजपनं 66 पैकी 20 अमराठी उमेदवार दिलेत. जितेंद्र पटेल, राणी त्रिवेदी, जिग्ना शाह, शिवकुमार झा, स्वाती जैस्वाल, सिद्धार्थ शर्मा, विनोद मिश्रा, तेजिंदर सिंह तिवाना, संदीप पटेल, सुधा सिंह, ममता यादव, हेतल गाला, नील सोमय्या, चंदन शर्मा, साक्षी कनोजिया, रवी राजा आणि आकाश पुरोहित या अमराठींना भाजपनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तर भाजप मराठीचा सन्मान करत समतोल साधत असल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
advertisement
मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीची वैशिष्ट्य काय?
भाजपनं अमराठी मतदारांची व्होट बँक जपण्यासाठी अमराठी उमेदवारांवर भर दिलाय. तर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारी यादीची वैशिष्ट्य आहेत. फोर एम वर उद्धव ठाकरेंची भिस्त असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई, मराठी, महिला आणि मुस्लीम यावर त्यांनी भर दिलाय. 40 महिलांना ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिलीय. मुंबईच्या रणांगणात 6 मुस्लीम उमेदवार उतरवण्यात आले आहेत. त्यातही 4 महिला उमेदवार आहेत. उमेदवारी यादीत असलेला मराठीचा ठसा आणि बहुसंख्येनं असलेल्या महिला उमेदवार यशस्वी ठरतील, असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतोय.
advertisement
ठाकरेंचे मुस्लीम उमेदवारांना प्राधान्य
ठाकरेंची शिवसेना आणि भाजपनं त्यांची व्होट बँक जपण्यासाठी शिकस्त केल्याचं पाहायला मिळतंय. आता अमराठी मतदार भाजपची कितपत पाठराखण करतात? तर मराठी आणि मुस्लीम मतदार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे किती उमेदवार निवडून देतात? हे आता निकालानंतरच स्पष्ट होईल. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास मुस्लिम मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजून कौल दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी ही रणनीती तर अवलंबली नाही ना? अशाही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BMC च्या पहिल्या यादीत ठाकरेंचा मराठीचा ठसा तर भाजपचं अमराठींना प्राधान्य,आकडेवारी पाहून बसेल धक्का











