युतीची घोषणा तर केली पण खिंडीत गाठलंच, चर्चेच्या टेबलावर फक्त 52 जागांचा प्रस्ताव; शिंदेंना जबर धक्का

Last Updated:

दोन्ही पक्षांमध्ये महापालिकेतील सीट वाटाघाटीत भाजपकडून शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती वरीष्ठ विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

News18
News18
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची महत्त्वपूर्ण पहिली बैठक पार पडणार आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये महापालिकेतील सीट वाटाघाटीत भाजपकडून शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती वरीष्ठ विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मुंबईत आज शिवसेना–भाजप यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबईत आज शिवसेना आणि भाजप यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक आज दुपारी २ वाजता, वसंत स्मृती, दादर येथे पार पडली . या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सीट शेअरिंग तसेच प्रचार (कॅम्पेन) रणनीतीवर सविस्तर चर्चा होणार आहे.

शिवसेना 125 जागा मिळाव्या यासाठी आग्रही

advertisement
मुंबई महापालिकेसाठी भाजप जवळपास 150 हून अधिक जागांवर लढण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला भाजप जवळपास 70-80 जागा देण्यास तयार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या कोट्यातून आरपीआयसाठी देखील 2-3 जागा देण्यात येणार आहे. शिवसेनेकडून 125 जागा मिळाव्या यासाठी आग्रह होता.

52 जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी

दरम्यान, आजच्या बैठकीत शिवसेनेचे 2017 सालचे माजी नगरसेवक शिंदेंसोबत आले आहेत, त्यांच्या संदर्भात निश्चिती केल्यानंतर भाजपकडून थेट आकडेवारी सोबत जागांची यादी समोर आली आहे. शिंदेंची ताकद असलेल्या 52 जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी आहे. शिंदेंच्या शिवसेनेत 2017 सालचे जवळपास 47 नगरसेवक आहेत.
advertisement

चर्चेदरम्यान वादावादी होण्याची शक्यता

भाजप आणि शिवसेनेत परवा वॉर्डनिहाय चर्चा होणार, ज्याद्वारे जागावाटपाची निश्चित होणार आहे. मात्र, उबाठामध्ये असलेल्या माजी नगरसेवकांच्या जागा शिंदेंना देण्यास भाजप अनुकूल नाही. अशात, यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चेदरम्यान वादावादी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

2017 सालचे गणित काय? 

2017 साली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती, तेव्हा राज्यात युतीमध्ये असूनही भाजप आणि शिवसेना मुंबई महापालिकेत वेगळी निवडणूक लढले होते. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली होती. शिवसेनेने 84 तर भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या, यानंतर मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर बसला.  या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंचा सामना भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरुद्ध आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
युतीची घोषणा तर केली पण खिंडीत गाठलंच, चर्चेच्या टेबलावर फक्त 52 जागांचा प्रस्ताव; शिंदेंना जबर धक्का
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement