Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी 17 विभागांत तब्बल 24 तास पाणी कपात

Last Updated:

3 आणि 4 डिसेंबर रोजी भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा जलवाहिनी बदलण्‍याचे काम रद्द केल्यानंतर आता मुंबईकरांना त्या कामासाठी नवीन डेडलाईन देण्यात आली आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकर पाणी जपून वापरा, 11 विभागात पाणीपुरवठा बंद, कधी आणि कुठं?
Mumbai Water Cut: मुंबईकर पाणी जपून वापरा, 11 विभागात पाणीपुरवठा बंद, कधी आणि कुठं?
भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी बदलण्याचे काम गेल्या काही दिवसांपूर्वी हाती घेण्‍यात आले होते. परंतु, ते काही कारणास्तव काम रद्द करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा एकदा बृहन्मुंहबई महानगर पालिकेकडून ते काम हाती घेण्यात आले आहे. 3 आणि 4 डिसेंबर रोजी जलवाहिनी बदलण्‍याचे काम रद्द केल्यानंतर आता मुंबईकरांना त्या कामासाठी नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. येत्या 8 आणि 9 डिसेंबरला जलवाहिनी बदलण्‍याचे काम हाती घेण्यात आले आहे.
भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी बदलण्याचे काम येत्या 8 आणि 9 डिसेंबर रोजी हाती घेण्यात आले आहे. या कारणाने सोमवार, दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून गुरूवार, दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 14 प्रशासकीय विभागांमध्‍ये पाणीपुरवठ्यात 15 टक्‍के कपात लागू राहणार आहे. तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी 2750 मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे.
advertisement
जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी अंथरण्‍याचे काही कामे प्रस्‍तावित आहेत. त्‍यासाठी साधारणतः 24 तासांचा कालावधी आवश्‍यक आहे. या कामकाजामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये अंदाजे 15 टक्‍के घट होणार आहे. याचा परिणाम म्‍हणून मुंबई शहर विभागातील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्‍तर विभाग ; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्‍तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरा‍तील एल आणि एस विभाग अशा एकूण 14 प्रशासकीय विभागांना होणा-या पाणीपुरवठ्यात 15 टक्‍के कपात केली जाणार आहे. सोमवार, दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मंगळवार, दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यात 15 टक्‍के कपात लागू राहणार आहे.
advertisement
मुंबई शहर विभागामध्ये, ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्‍तर विभाग या विभागाचा समावेश होतो. एन, एल आणि एस विभागाचा पूर्व उपनगर विभागात समावेश होतो. एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्‍तर, आर दक्षिण, आर उत्‍तर, आर मध्य विभाग हे पश्चिम उपनगरांमध्ये समावेश होतो. संबंधित सर्व परिसरातील नागरिकांना या कालावधीत कृपया पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात येत आहे. सोबतच, महानगर पालिका प्रशासनाकडून 8 आणि 9 डिसेंबर 2025 रोजी पाणी जपून वापरावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी 17 विभागांत तब्बल 24 तास पाणी कपात
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement