काश्मीरात अनर्थ घडला, लष्करी वाहन 200 फूट दरीत कोसळले; देशासाठी लढणाऱ्या 10 जवानांचा मृत्यू, 7 जण जखमी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण अपघात झाला आहे. लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळल्याने 10 जवान शहीद झाले असून 7 जवान गंभीर जखमी झाले आहेत.
डोडा: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले. या अपघातात 10 लष्करी जवानांचा मृत्यू झाला असून, इतर काही जवान गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी एकत्रितपणे रेस्क्यू ऑपरेशन राबवून जखमी जवानांना बाहेर काढले.
या अपघाताबाबत माहिती देताना लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी एक लष्करी वाहन 17 जवानांना घेऊन उंच भागातील एका चौकीकडे जात होते. यावेळी डोडा जिल्ह्यातील भद्रवाह-चंबा आंतरराज्य महामार्गावरील खानी टॉप परिसरात लष्कराचे बुलेटप्रूफ वाहन रस्त्यावरून घसरले आणि सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात 10 जवानांचा मृत्यू झाला असून उर्वरित जवान गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
Chief Minister has expressed deep grief over the tragic accident involving an Army vehicle at Khannitop on the Bhaderwah–Chamba road. He conveyed heartfelt condolences to the families of the soldiers who lost their lives and wished a speedy recovery to those injured, lauding the…
— Office of Chief Minister, J&K (@CM_JnK) January 22, 2026
advertisement
अपघाताची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. स्थानिक नागरिकही पोलिस आणि रेस्क्यू टीमच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. बचाव मोहिमेदरम्यान 10 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमी जवानांनाही दरीतून बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या तिघा जवानांना हेलिकॉप्टरद्वारे उधमपूर येथील कमांड रुग्णालयात हलवण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.
advertisement
दरम्यान लष्कराने या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी करत सांगितले आहे की, अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जखमी जवानांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच या अपघातात प्राण गमावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असल्याचेही लष्कराने स्पष्ट केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 3:54 PM IST
मराठी बातम्या/देश/
काश्मीरात अनर्थ घडला, लष्करी वाहन 200 फूट दरीत कोसळले; देशासाठी लढणाऱ्या 10 जवानांचा मृत्यू, 7 जण जखमी









