Crime : मुंबईत हे काय सुरु? तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; कारण ऐकून पोलिसही चक्रावले
Last Updated:
Mumbai News : चप्पल घालण्याच्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने जोरात हल्ला झाला शिवाय इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीसांनी मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल केला.
मुंबई : मुंबईतील परिसरातील एका मंदिरात चप्पल घालण्याच्या जुन्या वादामुळे एका तरुणावर गंभीर हल्ला झाला. तक्रारदार आणि त्याचा मित्र 1 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी सुमारे 5 वाजता भागवत कथा ऐकण्यासाठी गेले होते. त्यावेळी रोहन यादव तिथे आला आणि तुम्ही काल मंदिरात चप्पल घालून का आलात? असे विचारून वाद सुरू केला. त्याने फिर्यादीवर अश्लील शब्दांचा वापर केला आणि तिथून निघून जाण्यास सांगितले.
क्षुल्लक गोष्टीचे रुपांतर झालं...
वाद टाळण्यासाठी फिर्यादी आपल्या घरी निघून गेला मात्र काही वेळाने रोहन यादव, त्याचा भाऊ रिशी यादव आणि दोन अनोळखी व्यक्ती घेऊन त्याच्या घरी पोहोचले. रोहनने लोखंडी रॉडने फिर्यादीवर जोरात मारहाण केली. तसेच त्याच्यासोबत आलेल्या इतर तिघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुण जखमी झाला.
पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून रोहन यादव, रिशी यादव आणि इतर दोन आरोपींविरुद्ध मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत आणि आरोपींना लवकरच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परिसरात या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 1:10 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Crime : मुंबईत हे काय सुरु? तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; कारण ऐकून पोलिसही चक्रावले








