मध्य रेल्वेवरचा प्रवास होणार आणखी गारेगार, 14 नव्या AC लोकल धावणार, पाहा वेळापत्रक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
उन्हाळ्यात प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद करण्यासाठी मध्य रेल्वेने एप्रिलपासून मध्य मार्गावर 16 नवीन वातानुकूलित (AC) लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या 14 नव्या गाड्यांमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या काही नॉन-एसी लोकल्सची जागा घेण्यात येईल.
मुंबई : उन्हाळ्यात प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद करण्यासाठी मध्य रेल्वेने एप्रिलपासून मध्य मार्गावर 16 नवीन वातानुकूलित (AC) लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या नवीन वेळापत्रकाची घोषणा रविवारी करण्यात आली. या 14 नव्या गाड्यांमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या काही नॉन-एसी लोकल्सची जागा घेण्यात येईल. यामुळे एकूण एसी लोकल्सची संख्या 66 वरून 80 होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते स्वप्निल निला यांनी दिली.
या गाड्या सोमवार ते शनिवार चालतील. रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी याऐवजी नॉन-एसी लोकल्स धावतील.
या एसी लोकल्स सेवांचे वेळापत्रक ऑफिसला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले असून, सकाळपासून रात्रीपर्यंत सेवा उपलब्ध असणार आहेत.
मध्य रेल्वेचे नवीन एसी लोकल वेळापत्रक :
अप मार्गातील प्रमुख एसी लोकल सेवा :
advertisement
1) कल्याण -सीएसएमटी : पहिली एसी लोकल सकाळी 7:34 वाजता कळ्याणहून सुटून 9:05 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
2) बदलापूर-सीएसएमटी : 10:42 वाजता सुटून 12:12 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
3) ठाणे-सीएसएमटी दरम्यान चार सेवा :
1:28 pm – 2:25 pm
3:36 pm – 4:24 pm
5:41 pm –6:40 pm
9:49pm – 8:48 pm
advertisement
4) बदलापूर-ठाणे : रात्री 11:04 ला सुटून 11:59 ला पोहोचेल.
5) ठाणे-विद्याविहार : रात्री 12 वाजता सुटून 12:23 ला विद्याविहार येथे पोहोचेल.
परंतु या रेल्वे प्रशासनाच्या नव्या घोषणेनंतर मात्र, प्रवासी हक्क कार्यकर्ते सुभाष गुप्ता यांनी चिंता व्यक्त करताना म्हटले की, “एसी लोकल्समुळे सामान्य लोकांसाठी नॉन-एसी लोकल्समध्ये गर्दी वाढू शकते कारण एसी लोकल्सची क्षमता कमी आणि भाडे जास्त आहे. सध्या दररोज सरासरी 84,0000 प्रवासी एसी लोकल्सने प्रवास करतात. नवीन वेळापत्रकानुसार, आता अधिक प्रवाशांना आरामदायक आणि जलद सेवा मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 14, 2025 9:11 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मध्य रेल्वेवरचा प्रवास होणार आणखी गारेगार, 14 नव्या AC लोकल धावणार, पाहा वेळापत्रक