Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनी लक्ष द्या! तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
येत्या रविवारी मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वेवर रविवारी अभियांत्रिकी कामासोबतच काही तांत्रिकी कामासाठी आणि इतरत्र देखभालीच्या कामासाठी मेगाब्लक घेतला जाणार आहे.
मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी (25 जानेवारी) मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वेवर रविवारी अभियांत्रिकी कामासोबतच काही तांत्रिकी कामासाठी आणि इतरत्र देखभालीच्या कामासाठी मेगाब्लक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वे मार्गावर कोणकोणत्या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे, जाणून घेऊया...
मध्य रेल्वेच्या माटुंगा- मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर अप आणि डाऊन रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 03:45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 10:36 ते दुपारी 03:10 वाजेपर्यंत सुटणाऱ्या सर्व डाउन जलद मार्गावरील लोकल माटुंगा रेल्वे स्थानकावरून डाउन धीम्या मार्गावर चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे या ट्रेन त्यांच्या नियोजित स्थानकावरच थांबणार आहेत.
advertisement
मेगाब्लॉकच्या दरम्यान, लोकल नियोजित वेळेपेक्षा सुमारे 15 मिनिटे उशिराने धावणार आहे. मुलुंड स्थानकापासून सर्व फास्ट लोकल पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी एकदा रेल्वेच्या वेळापत्रकावर नजर टाकूनच घरातून निघायचे आहे. ठाणे स्थानकावरून सकाळी 11:03 ते दुपारी 03.38 वाजेदरम्यानची अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकावरून अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.
advertisement
त्या सर्व लोकल मुलुंड ते माटुंगादरम्यान त्यांच्या नियोजित स्थानकावरच थांबणार आहेत. त्यानंतर माटुंगा स्टेशनवर या ट्रेन पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मध्य रेल्वेवरील सर्व लोकल स्टेशनवर सुमारे 15 मिनिटे उशिराने पोहोचतील, याची प्रवाशांनी नोंद घ्यायची. तर, हार्बर लोकलबद्दल सांगायचे तर, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चुनाभट्टी/ बांद्रा स्थानकादरम्यान डाउन हार्बर मार्गावर 11:40 ते सायंकाळी 04:40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर चुनाभट्टी/ बांद्रा– मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान अप हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते 04:10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
advertisement
तर ट्रान्स हार्बरवर सुद्धा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 11:16 ते सायंकाळी 04:47 वाजेदरम्यान वाशी/ बेलापूर/ पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा या सकाळी 10:48 ते 04:43 वाजेदरम्यान बांद्रा/ गोरेगावकडे जाणाऱ्या सर्व डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. तर, पनवेल/ बेलापूर/ वाशी स्थानक येथून सकाळी 09:53 ते दुपारी 03:20 वाजेपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/ बांद्रा स्टेशनमधून सकाळी 10:45 ते सायंकाळी 05:13 वाजेपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्व अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहेत.
advertisement
ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा 20 मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना 10:00 ते सांयकाळी 06:00 वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 10:21 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनी लक्ष द्या! तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक









