कानाच्या ऑपरेशनसाठी भुलीचं इजेक्शन दिलं, महिला पोलिसाचा मृत्यू, मुंबईतली धक्कादायक घटना
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानाचं ऑपरेशन करण्याकरता रुग्णालयात गेलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे.
मुंबई, विजय वंजारा, प्रतिनिधी : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानाचं ऑपरेशन करण्याकरता रुग्णालयात गेलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. मुबईच्या अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरातून ही घटना समोर आली आहे. गौरी सुभाष पाटील असं या मृत पोलीस कर्मचारी महिलेचं नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल गौरी पाटील यांना हॉस्पिटलमध्ये कानाचं ऑपरेशन करण्याकरता भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
गौरी पाटील या मरोळ पोलीस कॅम्पात कार्यरत होत्या. त्या आपल्या कानाचं ऑपरेशन करण्याकरता लोखंडवाला इथल्या अक्सिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांना ऑपरेशनसाठी भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. कानाच्या ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांकडून चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे, गौरी पाटील यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात येत आहे.
गौरी पाटील यांना ऑपरेशनसाठी भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. कानाच्या ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांकडून चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे, गौरी पाटील यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांकडून होत असलेल्या आरोपांवर रुग्णालयानं बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी एडीआर दाखल केला असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2024 1:16 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
कानाच्या ऑपरेशनसाठी भुलीचं इजेक्शन दिलं, महिला पोलिसाचा मृत्यू, मुंबईतली धक्कादायक घटना


