advertisement

एका व्यक्तीच्या शरीरात संपूर्ण कुटुंबाची किडनी! आई, बाबा आणि भावाच्या किडनीवर जगतोय

Last Updated:

Rare Medical Case : दुबईतील व्यक्तीचे एक दुर्मिळ वैद्यकीय प्रकरण समोर आलेले आहे. जिथे त्याचे मुंबईत उपचार झाले असून आता त्याची वैद्यकीय स्थितीही अतिशय चांगली आहे.

News18
News18
मुंबई : जगभरात वैद्यकीय क्षेत्रात अनेक आश्चर्यकारक घटना घडत असतात. काही वेळा त्या इतक्या अनोख्या असतात की त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सध्या अशीच एक धक्कादायक आणि प्रेरणादायी घटना समोर आली असून तिची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
37 वर्षीय व्यक्तीचा पुनर्जन्म
मिळालेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय मुबीन जेलानी हे दुबईमध्ये सॉफ्टवेअऱ इंजिनिएर म्हणून काम करतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजवर यांचे तीन वेळा किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहे. मात्र यात तुम्हाला प्रश्न पडला असेल की तीन वेळा किडनी ट्रान्सप्लांट करणं शक्य आहे का? तसेच तीन वेळा कोणी किडनी दिली असेल.
advertisement
मुबीन जेलानी हे एक किडनी ट्रान्सप्लांट झालेले दुर्मिळ रुग्ण आहे. विशेष म्हणजे त्याला तिन्ही वेळा कुटुंबातील सदस्यांनीच किडनी दान केली. सध्या तो चार वर्षांच्या मुलीचा वडील असून आनंदाने सामान्य आयुष्य जगत आहे.
घरचे धावून आले पाठीशी
मुबीनला जन्मतःच 'पोस्टेरिअर युरेथ्रल वाल्व ऑब्स्ट्रक्शन' हा आजार होता. या आजारामुळे लघवीचा प्रवाह अडतो आणि हळूहळू किडनीचे नुकसान होते. त्यामुळे त्याच्या किडनीची समस्या लहानपणीच लक्षात आली. 17 ऑगस्ट 2000 रोजी त्याच्या आईने पहिली किडनी दान केली. त्यानंतर 10 मार्च 2015 रोजी वडिलांनी दुसऱ्यांदा किडनी दिली. तिसरा ट्रान्सप्लांट 9 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या भावाने केला.
advertisement
तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मुंबईत उपचार
मुबीनचे उपचार मुंबईतील रुग्णालयांत झाले. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरचे सचिव आणि नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. भारत शाह यांच्या देखरेखीखाली त्याची तपासणी सुरू आहे. डॉक्टरांच्या मते अनेक वेळा ट्रान्सप्लांट होणे दुर्मिळ असले तरी शक्य आहे. मात्र प्रत्येक वेळी रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती बदलत असल्याने नवीन किडनी स्वीकारणे कठीण असते.
ट्रान्सप्लांटनंतरही मुबीनचे आयुष्य सामान्य
सध्या मुबीन काही औषधे घेत आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. ''मी तीन वेळा ट्रान्सप्लांट झालोय हे कुणालाही कळत नाही, मी पूर्णपणे सामान्य जीवन जगतो,'' असे तो सांगतो. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच आज तो निरोगी आयुष्याचा आनंद घेत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
एका व्यक्तीच्या शरीरात संपूर्ण कुटुंबाची किडनी! आई, बाबा आणि भावाच्या किडनीवर जगतोय
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement