Ajit Pawar : अजितदादांचा घातपात? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, बारामतीत पहिली ठिणगी; आज 'हे' अख्खं गाव बंद
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
हा केवळ अपघात नसून तो एक 'नियोजित घातपात' असल्याचा गंभीर संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी आता जनतेतूनही संताप व्यक्त होत असून, लोणी भापकर गावाने आज 'गाव बंद'ची हाक दिली आहे.
पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. हा केवळ अपघात नसून तो एक 'नियोजित घातपात' असल्याचा गंभीर संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी आता जनतेतूनही संताप व्यक्त होत असून, बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावाने आज (२२ फेब्रुवारी) 'गाव बंद'ची हाक दिली आहे.
नेमका वाद काय?
आमदार रोहित पवार यांनी सलग तीन पत्रकार परिषदा घेऊन या अपघातावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ज्या कंपनीचे विमान अपघातात पडले, त्या कंपनीचे बड्या नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वैमानिकाची भूमिका: वैमानिक सुमित कपूर याच्या माध्यमातून हा घातपात घडवून आणला असावा, असा खळबळजनक संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. विमानात मोठ्या प्रमाणात इंधन साठा होता, ज्यामुळे स्फोट भीषण झाला. हा सर्व प्रकार पूर्वनियोजित असल्याचा दावा त्यांनी पुराव्यासह केला आहे.
advertisement
दिल्लीपर्यंत पोहोचलं प्रकरण
रोहित पवार यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. VSR कंपनीचे मालक आणि तेलगू देसम पक्षाचे घनिष्ठ संबंध असल्याने या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात ते पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्रही लिहिणार आहेत.
advertisement
लोणी भापकरमध्ये कडकडीत बंद
अजितदादांच्या निधनाचे वृत्त पचवणे बारामतीकरांसाठी आजही कठीण जात आहे. "आमच्या नेत्याचा मृत्यू नैसर्गिक नाही," अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे लोणी भापकर ग्रामस्थांनी आज रविवारी सर्व दुकाने आणि व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी पोलिसांना दिले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 10:27 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar : अजितदादांचा घातपात? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, बारामतीत पहिली ठिणगी; आज 'हे' अख्खं गाव बंद










