Mumbai News: बेस्ट बसेस स्टॉप बंद झाले, प्रवाशांचे हाल, रिक्षा-टॅक्सीवाले मालामाल
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Best Bus: बेस्ट प्रशासनाने बस थांब्यांमध्ये केलेल्या अचानक बदलांमुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. रिक्षा आणि टॅक्सीचा वापर प्रवाशांकडून सर्वाधिक केला जात असल्यामुळे आर्थिक गणित कोलमलडले.
मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी बेस्ट प्रशासनाने अनेक बस थांब्यांमध्ये बदल केलेला आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बेस्ट प्रशासनाने केलेल्या या बदलामुळे बस पकडण्यासाठी प्रवाशांची एकच गर्दी होताना दिसतेय. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा फटका बेस्ट बसची जी सातत्याने संख्या कमी होत आहे, त्याला बसताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत, मुंबई आणि परिसरातील जवळपास 100 बस मार्ग बंद करण्यात आले आहेत, ज्यामुळे दैनंदिन प्रवाशांसमोर काही मर्यादितच पर्याय उरले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहायला सुद्धा मिळत आहे.
सध्या, बेस्टच्या ताफ्यात जवळपास 2676 बस आहेत. त्या दररोज जवळपास 23 लाख प्रवाशांना सेवा देतात. रस्त्यावर बसची संख्या कमी झाल्यामुळे, अनेक मार्गांवर प्रवाशांना आता 45 ते 50 मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते, त्यामुळे अनेक मुंबईकरांना दररोज ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. बसच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे अनेक प्रवासी अधिकाधिक प्रमाणात शेअर रिक्षा किंवा टॅक्सींकडे वळत आहेत. या सेवांमध्ये, विशेषतः पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये, लक्षणीय वाढ झाली आहे. शेअर रिक्षा किंवा टॅक्सी या गर्दीच्या वेळी रेल्वे स्टेशन, रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स आणि ऑफिसेस आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालतात.
advertisement
बसच्या भाड्यांपेक्षा, रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडे सर्वाधिक आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला अधिक झळ बसते. बेस्ट बसचे भाडे किमान 12 रुपये आहे, तर शेअर रिक्षाचे भाडे प्रति प्रवासी सुमारे 15 रुपये आणि शेअर टॅक्सीचे भाडे 20 ते 25 रुपयांच्या दरम्यान असते. यामुळे अनेक कुटुंबांचं महिन्याचं बजेट कोलमडत आहे. मासिक खर्चात वाढ होत आहे. कामासाठी किंवा शिक्षणासाठी एकत्र प्रवास करणाऱ्यांना वाढता प्रवासाचा खर्च सांभाळणे अवघड जात आहे. बस स्टॉपवर थांबलेले प्रवासी अनेकदा ऑटो किंवा टॅक्सी शेअर करण्यासाठी आपापसात बोलत असताना दिसतात. या माध्यमातूनच आपलं कोलमडत असलेलं महिन्याचं बजेट सावरण्याचे चिन्ह असते.
advertisement
दक्षिण मुंबईत, विशेषतः चर्चगेट, कुलाबा आणि नरिमन पॉइंटसारख्या परिसरातील असलेल्या ऑफिसेसमधल्या कर्मचाऱ्यांसाठी शेअर टॅक्सी हे वाहतुकीचे एक पसंतीचे साधन बनले आहे. उशीर टाळण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वे स्टेशनपर्यंत थोड्या अंतरासाठी चालत जाणे पसंत करतात. दरम्यान, घाटकोपर ते अंधेरी कॉरिडॉर आणि सीएसएमटी ते बीकेसी मार्गासारख्या मेट्रो सेवांनी जलद आणि अधिक निश्चित प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून देत काही प्रमाणात दिलासा दिला आहे. शहरात साडेचार लाखांहून अधिक रिक्षा आणि जवळपास 28,000 टॅक्सी कार्यरत असल्यामुळे, अनेक प्रवाशांचा साधारणतः कल हा रिक्षा किंवा टॅक्सीतून प्रवास करत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 8:58 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: बेस्ट बसेस स्टॉप बंद झाले, प्रवाशांचे हाल, रिक्षा-टॅक्सीवाले मालामाल










