IPL 2026 : लिलावात अनसोल्ड, एकही मॅच खेळला नाही... विदर्भाच्या पोट्ट्याची अचानक आयपीएलमध्ये एन्ट्री!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 चा मोसम आता फक्त पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे, पण त्याआधी आयपीएलला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. स्पर्धा सुरू व्हायच्या आधीपासूनच बरेच फास्ट बॉलर दुखापतींमुळे आयपीएलमधून बाहेर झाले आहेत.
नागपूर : आयपीएल 2026 चा मोसम आता फक्त पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे, पण त्याआधी आयपीएलला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. स्पर्धा सुरू व्हायच्या आधीपासूनच बरेच फास्ट बॉलर दुखापतींमुळे आयपीएलमधून बाहेर झाले आहेत, त्यामुळे नवीन फास्ट बॉलर शोधताना सर्व टीमची धावाधाव सुरू आहे. दुखापतींचा सगळ्यात जास्त फटका कोलकाता नाईट रायडर्सना (केकेआर) बसला आहे.
केकेआरमधून फास्ट बॉलर आकाश दीप आणि हर्षित राणा बाहेर झाले आहेत. तर मथिशा पथिराणाही सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. आयपीएल लिलावामध्ये केकेआरने मुस्तफिजुर रहमानला विकत घेतलं, पण बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल खेळण्यावर बंदी घातल्यामुळे मुस्तफिजुरही खेळू शकणार नाही.
विदर्भाचा खेळाडू केकेआरमध्ये
एका मागोमाग एक फास्ट बॉलर बाहेर होत असतानाच केकेआरने टीममध्ये विदर्भाचा खेळाडू सौरभ दुबेला टीममध्ये घेतलं आहे. आकाश दीपच्या जागी सौरभ दुबे केकेआरमध्ये आला आहे. सौरभ दुबे याआधी सनरायजर्स हैदराबादच्या टीमचा भाग होता.
advertisement
आयपीएल 2022 च्या लिलावामध्ये सनरायजर्स हैदराबादने सौरभ दुबेला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं होतं, पण त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. आयपीएल 2026 मध्ये सौरभने त्याची बेस प्राईज 30 लाख रुपये ठेवली होती, पण कोणत्याच टीमने त्याला विकत घेतलं नाही. क्रिकबझच्या वृत्तानुसार सौरभ आधीपासूनच केकेआरच्या टीमसोबत ट्रेनिंग करत आहे. डावखुरा फास्ट बॉलर असलेला सौरभ विदर्भाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
advertisement
सौरभच्या 8 सामन्यांमध्ये 16 विकेट
सौरभ दुबेने आतापर्यंत लिस्ट ए क्रिकेटच्या 8 सामन्यांमध्ये 16 विकेट घेतल्या आहेत. तर 3 टी-20 सामन्यांमध्येही सौरभ खेळला आहे. 2019 साली झालेल्या आशिया कप इमर्जिंग स्पर्धेमध्ये सौरभ भारतीय टीमचा भाग होता. लिस्ट ए क्रिकेटच्या आपल्या पहिल्याच सामन्यात सौरभने नेपाळविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आणि फक्त 26 रन देऊन 4 विकेट घेतल्या. या कामगिरीबद्दल त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देऊन गौरवण्यात आलं. स्पर्धेमध्ये सौरभने एकूण 7 विकेट घेतल्या.
advertisement
रहाणेच्या नेतृत्वात खेळणार केकेआर
आयपीएल 2026 मध्ये केकेआर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणार आहे. मागच्या मोसमातही रहाणेच केकेआरचा कर्णधार होता, पण टीमने 14 पैकी फक्त 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, तर 7 सामन्यांमध्ये टीमचा पराभव झाला.
फिन ऍलन, टीम सायफर्ट आणि कॅमरन ग्रीन टीममध्ये आल्यामुळे केकेआरची बॅटिंग मजबूत झाली आहे. ऍलनने टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये फक्त 33 बॉलमध्ये वादळी शतक झळकावलं. तर टीम सायफर्टचा फॉर्मही उत्कृष्ट आहे. आंद्रे रसेलच्या निवृत्तीनंतर केकेआरकडे रोव्हमन पॉवेलच्या रुपात वेस्ट इंडिजचा धमाकेदार फिनिशर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 8:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : लिलावात अनसोल्ड, एकही मॅच खेळला नाही... विदर्भाच्या पोट्ट्याची अचानक आयपीएलमध्ये एन्ट्री!










