shivsena : शिवसेनेच्या गोटात धाकधूक वाढली, एका सर्व्हेमुळे उमेदवारांनी भरली धडकी, या खासदारांचा रिपोर्ट निगेटिव्ह!

Last Updated:

यात शिवसेना पक्षाचे तीन ते चार खासदार यांचा सर्व्हे पूर्णतः निगेटिव्ह आल्याने या विद्यमान खासदारांना खासदारकीला मुकावे लागू शकते.

(शिवसेनेमध्ये सर्व्हेमुळे चिंतातूर वातावरण)
(शिवसेनेमध्ये सर्व्हेमुळे चिंतातूर वातावरण)
अजित मांढरे, प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना माहितीतील सर्व जागांवरती उमेदवार अजून घोषित करण्यात आले नाही. तर महायुतीतील सर्वच उमेदवारांची घोषणा करण्याआधी सर्वच प्रकारच्या शक्यतांची चाचपणी केली जात आहे. यामुळे महायुतीच्या उमेदवारांची घोषणा करण्यास वेळ लागतोय. दरम्यान महायुती म्हणून करण्यात आलेला सर्व्हे आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी त्यांचा स्वतंत्र केलेला सर्व्हे या आधारावर लोकसभा निवडणूक उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.
advertisement
यात शिवसेना पक्षाचे तीन ते चार खासदार यांचा सर्व्हे पूर्णतः निगेटिव्ह आल्याने या विद्यमान खासदारांना खासदारकीला मुकावे लागू शकते. यामध्ये वाशिमच्या खासदार भावना गवळी यांचा सर्व्हे निगेटिव्ह आला असून त्यांच्या जागी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांची वर्णी लागू शकते. कारण महायुतीने केलेल्या आणि शिवसेनेने केलेल्या सर्व्हे मध्ये संजय राठोड यांना ए प्लस प्लस शेरा मिळाला आहे. तर दुसरीकडे शिर्डीचे सदाशिव लोखंडे यांचा देखील दोन्ही अहवाल निगेटिव्ह आला असून कृपाल तुमाने रामटेकचे खासदार असून हे देखील महायुती आणि शिवसेनेच्या सर्व्हेत निगेटिव्ह म्हणून दर्शविले गेले. या दोघांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची चाचणी केली जात आहे.
advertisement
काही विद्यमान खासदारांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वरिष्ठांची भेट घेतली असून भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आम्हाला उमेदवारी द्यावी याकरता फिल्डिंग लावल्याचे समजतेय. तर कोल्हापूरचे संजय मंडलिक हे देखील या निगेटिव्ह सर्व्हे आले असून ती जागा कोण लढवणार याकरता महायुतीने विशेष बैठक घेऊन तगडा उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी यासोबतच नाशिकचे हेमंत गोडसे यांचा देखील सर्व्हे निगेटिव्ह आला असून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला A प्लस प्लस शेरा मिळाला आहे.
advertisement
माहिती आणि प्रत्येक पक्षाच्या या सर्व्हेनंतर महायुतीतील सर्वच वरिष्ठांनी हे सर्व गंभीरतेने घेऊन त्या दृष्टीने पावले देखील उचलली आहेत. यामुळे काही ठिकाणी उमेदवारी जाहीर न करताच नुकताच ज्यांनी पक्षात प्रवेश केले आहे, अशांना तिकीट देणार असल्याची माहिती वरिष्ठांनी ठरवल्याची सूत्रांनी माहिती दिली. यामुळे काही उरलेल्या जागांवरील उमेदवारांची नावे ही आश्चर्यकारक असतील यात काही शंका नाही.
advertisement
दरम्यान, अनेक ठिकाणी उमेदवारांनी प्रचार देखील सुरू केला असून फक्त नावांच्या घोषणांची वाट संबंधित उमेदवार पाहत आहेत पण जोपर्यंत अधिकृत यादी जाहीर होत नाही तोपर्यंत कोणाला डच्चू मिळणार आणि कोणाची वर्णी लागणार हे तेव्हा स्पष्ट होईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
shivsena : शिवसेनेच्या गोटात धाकधूक वाढली, एका सर्व्हेमुळे उमेदवारांनी भरली धडकी, या खासदारांचा रिपोर्ट निगेटिव्ह!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement