मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, केंद्राकडून मदत कधी मिळणार? उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Last Updated:

मराठवाड्यात पावसामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहे. हाता-तोंडाशी आलेलंं पिक पाण्याखाली गेलं आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहे.

News18
News18
मुंबई : मराठवाड्यात पावसामुळे हाहाकार माजला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शेतं पाण्याखाली गेली आहे. शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. एकीकडे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलं आहे. तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी असा कोणताही निर्णय घेतल्याचं ऐकलं नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. तसंच, केंद्रीय पथक लवकरच पाहणीसाठी येणार आहे, तत्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असंही शिंदेंनी सांगितलं.
मराठवाड्यात पावसामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहे. हाता-तोंडाशी आलेलंं पिक पाण्याखाली गेलं आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहे. पण अजूनही सरकारकडून काही मदत जाहीर झालेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या अस्मानी संकटावर प्रतिक्रिया दिली आहे.
'प्रताप सरनाईक यांचा देखील त्यांचा दौरा होता. विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली. एकच वेळेला फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. जमीन देखील खचून गेली आहे. संपूर्ण माती वाहून गेल्यामुळे जमीन वाहून गेली आहे. आज कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली आहे. युद्ध पातळीवर पंचनामे होतील. शासन म्हणून आम्ही शेतकऱ्याचा पाठीशी आम्ही उभे आहोत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील सूचना केली आहे. मुख्यमंत्री देखील सोलापूर दौऱ्या वर जाणार आहे आणि मी पण धाराशिव येथे जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे नुकसान झालं आहे त्या ठिकाणी मंत्री त्याची पाहणी करतील. तत्काळ शेतकरी संकटात आहे त्यांना मदत देणे. याला आम्ही प्राधान्य देत आहे. युद्धपातळीवर पंचनामे करून मदत पोहोचतो करू. दिवाळीपूर्वी आम्ही मदत करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः केंद्राशी बोलून आहे. केंद्राची पथके येणार आहे. केंद्र आपल्याला मदत करणार आहे. मदत मिळणार आहे, असं आश्वासन शिंदेंनी दिलं.
advertisement
उद्धव ठाकरेंना टोला
'महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी असा निर्णय घेतल्याचं ऐकण्यात आला नाही. आम्ही दुटप्पी भूमिका घेणार नाही घेतली नाही. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. घरे पडली आहेत आणि जनावरे वाहून गेली आहेत त्याला मदत करू, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला.
मराठी बातम्या/मुंबई/
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, केंद्राकडून मदत कधी मिळणार? उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement