तरुणाईच्या आत्महत्येसंदर्भात निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांचा महत्त्वाचा सल्ला, नेमकं काय म्हणाले?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
डी. शिवानंदन म्हणाले की, ‘सध्या युवकांमध्ये मानसिक तणाव, सोशल मीडियाचा अतिवापर, पालकांकडून वाढत जाणाऱ्या अवास्तव अपेक्षा या गोष्टी निराशा आणि आत्महत्या यासाठी कारणीभूत ठरत आहे.
मुंबई : ‘सध्या देशात दर वर्षाला 1 लाख 70 हजार लोकांचा मृत्यू होतो. यामध्ये तब्बल 70% तरुणांना समावेश असून यामागे निराशा, मानसिक तणाव, पालकांचा दबाव अशी अनेक कारणे त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे तरुणांनी सतर्क रहावे’ असा सल्ला महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी दिला.
युवा परिवर्तन संस्थेच्या रौप्य महोत्सव समापन कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. युवा परिवर्तनच्या माध्यमातून वंचित समाजातून येणाऱ्या महिलांना आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. यासाठी काही व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमही चालवले जातात.
काय म्हणाले डी. शिवानंदन?
या कार्यक्रमात डी. शिवानंदन म्हणाले की, ‘सध्या युवकांमध्ये मानसिक तणाव, सोशल मीडियाचा अतिवापर, पालकांकडून वाढत जाणाऱ्या अवास्तव अपेक्षा या गोष्टी निराशा आणि आत्महत्या यासाठी कारणीभूत ठरत आहे. गेल्या दोन वर्षातील मुंबई, दिल्ली अशा मोठ्या शहरातील घडलेल्या घटनांचाही आढावा घेतला असता, पालक, तसेच शिक्षकांनी मुलांना योग्य त्या गोष्टींना नाही म्हणणे, शाळा तसेच कॉलेजमध्ये जागरुकता निर्माण करणे या गोष्टी गरजेच्या आहेत, असे ते म्हणाले.
advertisement
या कार्यक्रमाला युवा परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक किशोर आणि मृणालिनी खेर, संस्थेच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आर गोपालकृष्णन तसेच बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे चेयरमन डॉ. जन्मजेय सिन्हा उपस्थित होते. ‘उद्योजकता आणि कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून देशात समृध्दी आणणे’ ही या वर्षाची थीम होती.
भारतातील बेरोजगारी ही खरी समस्या नसून माणसाला कामानुसार योग्य मानधन मिळत नाही ही आहे. येथे प्रत्येकजण काम करतो. पण तो पुरेसे पैसे कमवेलच असे नाही. प्रत्येक शेतकऱ्याला व्होकेशनल ट्रेनिंगची गरज आहे, असे यावेळी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे जन्मजेय सिन्हा यांनी सांगितले. तर ‘देशाच्या अर्थकारणात महिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांना त्यांच्या मेहनत आणि योग्यतेनुसार योग्य मानधन मिळाले पाहिजे. महिला देशाच्या जीडीपीमध्ये मोलाची भूमिका बजावतात,’ असे वक्तव्य टाटा सन्सचे माजी चेअरमन आणि संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आर गोपालकृष्णन यांनी केले.
advertisement
Business Idea : घराच्या गच्चीवर सुरू केलं नवीन शॉप, बदलापूरमधील दाम्पत्याची प्रेरणादायी कहाणी
25 वर्षापूर्वी एका चांगल्या धोरणाने सुरू केलेल्या कामाचे आज वटवृक्षात रुपांतर झालेले आहे, असे सांगत संस्थापक किशोर खेर यांनी या 25 वर्षात संस्थेत झालेल्या स्थित्यंतराबद्दल सांगितले. विश्वस्त मंडळाचे सदस्य सुमन श्रीवास्तव आणि एन श्रीनाथ, सत्व कन्सल्टिंगचे रथीश बालकृष्ण आणि हकदर्शक संस्थेच्या शिल्पी पाटणी यांनी ‘ग्रामीण भागातील उपजिवीकेच्या संधी आणि समस्या’ या विषयावर आपली मते मांडली. तेथील समस्या तसेच करायचे उपाय याबद्दलही त्यांनी सखोलपणे चर्चा केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2024 5:56 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
तरुणाईच्या आत्महत्येसंदर्भात निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांचा महत्त्वाचा सल्ला, नेमकं काय म्हणाले?







