Kalyan Metro Update : कल्याण ते नवी मुंबई सुसाट, आता मेट्रो प्रवास फक्त 45 मिनिटांत, थांबे कुठं? संपूर्ण माहिती
Last Updated:
Kalyan To Taloja In Just 45 Minutes : कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास आता फक्त 45 मिनिटांत होणार. प्रवाशांसाठी सोयीस्कर रूट, स्थानकांची माहिती आणि नवीन मेट्रो सुविधा जाणून घ्या,ज्यामुळे प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होईल.
कल्याण : कल्याणहून नवी मुंबईला रोज कामाला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता कल्याण ते नवी मुंबईचा प्रवास आता फक्त 45 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबईसह उपनगरांत मेट्रोची वाढती नेटवर्क हळूहळू आकार घेत आहे. अनेक मेट्रो प्रकल्प अंतिम टप्प्यावर आहेत, तर काहींचे बांधकाम वेगाने सुरू आहे. त्यातील महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई मेट्रो लाईन 12. या मार्गिकेमुळे कल्याण आणि तळोजा ही शहरे थेट जोडली जाणार आहेत. याशिवाय मुंबई शहरातून थेट ठाण्यापर्यंतचा संपर्कही मेट्रोद्वारे सुलभ होणार आहे.
कल्याण ते नवीन मुंबई प्रवास होणार सुसाट!
मेट्रो लाईन 12ला ऑरेंज लाइन म्हणून ओळखले जाणार असून ही मेट्रो लाईन 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) चा विस्तारीत भाग आहे. मागील वर्षी या मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. सध्या या प्रकल्पाचे खांब उभारण्याचे काम जोरात सुरू आहे आणि वर्षभराच्या आत बांधकामात लक्षणीय प्रगती दिसून आली आहे. इंटरनेटवरील काही युजर्सच्या माहितीनुसार मेट्रो 12 हा भारतातील सर्वात वेगाने उभारला जाणारा प्रकल्प ठरतोय. या प्रकल्पात मार्गिका आणि डेपोचे काम एकाच वेळी सुरू असणे ही एक अनोखी बाब आहे.
advertisement
या मार्गिकेची एकूण लांबी 22.17 किलोमीटर आहे आणि यावर 19 स्थानके असणार आहेत. मेट्रोचा प्रवास एपीएमसी कल्याण पासून सुरू होऊन अमनदूत तळोजा पर्यंत असेल. या मार्गिकेत दोन इंटरचेंज स्थानके असतील. पहिले, कल्याण एपीएमसी जे मेट्रो लाईन 5 शी जोडले जाईल आणि दुसरे अमनदूत तळोजा जे मेट्रो लाईन 1 शी जोडले जाईल. या मेट्रो प्रकल्पामुळे कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास आता फक्त 45 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होऊन सेवेत येईल.
advertisement
कोणती असतील स्थानके?
view commentsकल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसावली, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, तळोजा या प्रकल्पामुळे मुंबई उपनगरांतील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सोपा आणि आरामदायक होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 23, 2025 9:00 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Kalyan Metro Update : कल्याण ते नवी मुंबई सुसाट, आता मेट्रो प्रवास फक्त 45 मिनिटांत, थांबे कुठं? संपूर्ण माहिती