Mumbai Metro : गुड न्यूज! मीरा-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली; मेट्रो-9 सुरू होण्याची तारीख आली समोर
Last Updated:
Metro Line 9 Update : दहिसर ते मीरा-भाईंदरदरम्यान धावणारी ही मेट्रो सुरु होण्याची लवकर शक्यता आहे. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई : मुंबई शहरात गेल्या काही वर्षात लोकलसोबत मेट्रोमार्गाचे जाळे विस्तारले आहेत. अनेक ठिकाणी नव्या मेट्रो मार्गिकीचे कामही सुरु आहेत त्यातील एक महत्त्वाची मेट्रो 9. ही मेट्रो मार्गिका कधी सुरु होणार आहे याबाबत एक अपडेट समोर आलेली आहे.
दहिसर-मीरा भाईंदर कनेक्टिव्हिटी सज्ज
एमएमआरडीए मार्फत विकसित केली जात असलेली मेट्रो लाईन 9 उत्तर मुंबईतील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या मेट्रो मार्गाचे उद्घाटन फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही मेट्रो लाईन दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदरदरम्यान धावणार असून त्यामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
सध्या पश्चिम उपनगरांमधून मिरा-भाईंदरकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ते वाहतूक आणि लोकल ट्रेनमधील गर्दीमुळे प्रवास वेळखाऊ आणि त्रासदायक ठरतो. अशा परिस्थितीत मेट्रो लाईन 9 सुरू झाल्यास प्रवास अधिक जलद, सोपा आणि सुरक्षित होणार आहे.
advertisement
मेट्रो लाईन 9 ही प्रत्यक्षात मेट्रो लाईन 7 (दहिसर ते गुंदवली) चाच विस्तारित भाग आहे. सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गावर एकूण 8 स्थानके असणार आहेत. ही संपूर्ण मार्गिका उन्नत स्वरूपाची असल्याने रस्त्यावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.
वाहतूक कोंडीला सुटका; मेट्रोने 25 मिनिटांत पूर्ण होणार अंतर
या मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर मिरा-भाईंदरमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या दहिसर किंवा बोरीवली गाठण्यासाठी नागरिकांना रस्त्याने बराच वेळ खर्च करावा लागतो. मात्र मेट्रोमुळे हेच अंतर अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होईल, वाहनांचा ताण कमी होईल आणि उत्तर मुंबईतील दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी बनेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 10:20 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : गुड न्यूज! मीरा-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली; मेट्रो-9 सुरू होण्याची तारीख आली समोर







