मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा युवकावर जीवघेणा हल्ला, रक्ताने शर्ट माखला तरी मारत राहिले
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
कांदिवली पूर्व रामगड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एका युवकावर जीवघेणा हल्ला केला आहे.
विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई: कांदिवली पूर्व रामगड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एका युवकावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने वार केले आहेत. संबंधित तरुण रक्तबंबाळ झालेला असतानाही ठाकरे गटाचे पदाधिकारी तरुणाला मारत राहिले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ एका स्थानिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. ज्यात एक टोळकं तीन तरुणांना मारहाण करताना दिसत आहे.
कार्यक्रमात सन्मान न मिळाल्याने काढला राग
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रामगडच्या एका झोपडपट्टी परिसरात साईबाबा भंडाऱ्याचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात शिवसेना पदाधिकाऱ्यांना अपेक्षित मान सन्मान मिळाला नाही. याचेच वर्चस्ववादात रुपांतर झालं. यातून रात्री उशिरा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी युवकावर हल्ला केला, असा आरोप रहिवाशांनी केला आहे
घटनेनंतर पीडित कुटुंबीय व स्थानिक नागरिक कुरार पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र काही शिवसेना पदाधिकारी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
advertisement
कुरार पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्ल्यात सहभागी आरोपींची ओळख पटवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनं परिसरात तणाव निर्माण झाला असून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा स्थानिक राजकीय वादातून निर्माण होणाऱ्या गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर घेऊन आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 10:14 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा युवकावर जीवघेणा हल्ला, रक्ताने शर्ट माखला तरी मारत राहिले


