Shocking News : घरी सुखी संसार असूनही ऑनलाइन प्रेम झालं, कुर्ल्यातील तरुणासोबत नको ते घडलं

Last Updated:

Mumbai Crime News : सोशल मीडियावर ओळख झालेल्या महिलेने प्रेमाचे नाटक करत कुर्ल्यातील एका सुशिक्षित तरुणाकडून सुमारे 10 लाख रुपये उकळले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे.

News18
News18
मुंबई : सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका महिलेनं खोट्या कारणांचा वापर करून कुर्ला येथील एका सुशिक्षित तरुणाची जवळपास दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणाने कुर्ला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
नेमकं घडलं काय?
तक्रारदार हा आपल्या पत्नी आणि मुलांसह कुर्ला पश्चिम परिसरात राहतो. तसेच कुर्ला परिसरात त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर एका महिलेशी मैत्री करण्यासंदर्भातील जाहिरात पाहिली. त्यानंतर दोघांमध्ये ऑनलाईन संवाद सुरू झाला.
हळूहळू आरोपी महिलेनं तक्रारदाराशी जवळीक वाढवली आणि त्याच्यावर प्रेम असल्याचं नाटक केलं. काही काळानंतर तिनं आपल्या वडिलांची तब्येत गंभीर असल्याचं सांगून पैशांची मागणी केली. विश्वास ठेवून तक्रारदाराने तिला पैसे पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी तिनं वडिलांचं निधन झाल्याचं सांगत पुन्हा पैशांची मागणी केली.
advertisement
अशा विविध खोट्या कारणांद्वारे आरोपी महिलेनं तक्रारदाराकडून एकूण 9 लाख 85 हजार रुपये उकळले. मात्र, काही दिवसांनतर तक्रारदाराला संशय येऊ लागला आणि त्यानं पुढे पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपी महिलेनं त्याला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
या धमकीनंतर तक्रारदाराने कुर्ला पोलिस ठाण्यात धाव घेऊन महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking News : घरी सुखी संसार असूनही ऑनलाइन प्रेम झालं, कुर्ल्यातील तरुणासोबत नको ते घडलं
Next Article
advertisement
Dharashiv News : राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं तुळजापुरात खळबळ
राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं
  • राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं

  • राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं

  • राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं

View All
advertisement