advertisement

Lamborghini Fire: भर रस्त्यात पेटली कोट्यावधींची लॅम्बोर्गिनी, कोस्टल रोडवर घडला थरार!

Last Updated:

बिजनेसमन गौतम सिंघानिया यांनी लॅम्बोर्गिनीने पेट घेतला आणि आगीचे कसे मोठमोठे लोण उठले याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. मुंबई पोलिसांना हा व्हिडिओ टॅग करून त्यांनी लिहिलंय...

कारचं मोठं नुकसान.
कारचं मोठं नुकसान.
मुंबई : कोस्टल रोडवरून धावणाऱ्या आलिशान लॅम्बोर्गिनी कारने अचानक पेट घेतला आणि एकच खळबळ उडाली. 5 कोटींच्या या ऑरेंज लक्झरी कारमधून झपाझप आगीचे लोण उठले. या आगीचा अक्षरश: अंगावर काटे आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय.
बुधवारी 26 डिसेंबर रोजी रात्री 10.20 वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याचं कळतंय. अग्निशमन दलाच्या जवानांनी 45 मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं यात कोणालाही इजा झाली नाही, परंतु कारचं मात्र मोठं नुकसान झालं.
बिजनेसमन गौतम सिंघानिया यांनी लॅम्बोर्गिनीने पेट घेतला आणि आगीचे कसे मोठमोठे लोण उठले याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. मुंबई पोलिसांना हा व्हिडिओ टॅग करून त्यांनी लिहिलंय, 'कोस्टल रोडवर आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळणारी लॅम्बोर्गिनी दिसली. अशा घटनांमुळे लॅम्बोर्गिनीच्या विश्वासार्हता आणि सुरक्षा मानकांबद्दल चिंता निर्माण होते. किंमत आणि प्रतिष्ठेसाठी एखाद्याला गुणवत्तेची अपेक्षा असते, संभाव्य धोक्यांची नाही', असं त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
advertisement
लॅम्बोर्गिनी ही अनेकजणांनी ड्रीम कार असते, जिची किंमत आहे कोट्यवधी रुपये. एवढे रुपये खर्च करून खरेदी केलेल्या या कारला आग लागणं गंभीर आहे, अशा भावना नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. तसंच ही आग लागली की कोणी लावली, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, लॅम्बोर्गिनी आग दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवर गुजरातमधील रजिस्ट्रेशन नंबर होता.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Lamborghini Fire: भर रस्त्यात पेटली कोट्यावधींची लॅम्बोर्गिनी, कोस्टल रोडवर घडला थरार!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement