Dadar Railway Station : रेल्वेचा मोठा निर्णय! दादर स्थानकात उभा राहणार गेमचेंजर प्रकल्प; प्रवाशांना मोठा दिलासा

Last Updated:

Dadar Railway Station Update : दादर रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी डेक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुविधेमुळे प्रवाशांची ये-जा सुलभ होणार असून सुरक्षितता आणि सोयींमध्ये सुधारणा होणार आहे.

मुंबई : दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतहा फलाटांवरील गर्दी विभागण्यासाठी दादर स्थानकात डेक उभारण्यात येणार आहे. या डेकमुळे प्रवाशांची ये-जा करण सोयीस्कर होणार असून गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
गर्दी कमी करणारा गेमचेंजर प्रकल्प लवकरच
खार आणि बोरिवली रेल्वे स्थानकांवर ज्या पद्धतीने डेक उभारण्यात आले आहेत त्यानुसार आता दादर येथेही ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांनी ही माहिती दिली. दादर स्थानकावर डेक उभारल्याने प्रवाशांना फायदा होईल तसेच अपघातांची शक्यता कमी होईल असे त्यांनी सांगितले.
advertisement
भारत मर्चंट्स चेंबरच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त काळबादेवी रोडवरील भारत चेंबर भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकज सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भारत चेंबर भवनाचे अध्यक्ष मनोज जालान यांनी मुंबईतील रेल्वे स्थानके आणि फलाट वर्ल्ड क्लास दर्जाचे करण्याची गरज व्यक्त केली. तसेच मरिन लाइन्स, चर्नी रोड आणि ग्रँट रोड यांसारख्या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्याची मागणीही त्यांनी केली.
advertisement
रेल्वेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
यावर उत्तर देताना पंकज सिंह यांनी मरिन लाइन्स स्थानकावर प्रवासी सुविधांचा विस्तार वेगाने सुरू असल्याचे सांगितले. तसेच पश्चिम रेल्वेला नुकतीच एक नवी एसी लोकल ट्रेन मिळाली असून तिची चाचणी सुरू आहे. लवकरच दररोज 10 ते 12 नवीन एसी लोकल सेवा सुरू केल्या जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Dadar Railway Station : रेल्वेचा मोठा निर्णय! दादर स्थानकात उभा राहणार गेमचेंजर प्रकल्प; प्रवाशांना मोठा दिलासा
Next Article
advertisement
Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election:  ठाकरे बंधूंचा आज 'मेगा शो'! २० वर्षांनी राज ठाकरे 'शिवसेना भवनात', 'या' १० मोठ्या घोषणानी बीएमसी निवडणुकीचा गेम बदलणार?
ठाकरे बंधूंचा आज 'मेगा शो'! २० वर्षांनी राज ठाकरे 'शिवसेना भवनात', 'या' १० मोठ्य
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज प्रचाराचा मेगा संडे

  • महापालिका निवडणुकीत युती जाहीर झाल्यानंतर आज ठाकरे बंधूंकडून वचननामा जाहीर करण्य

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जवळपास २० वर्षानंतर शिवसेना भवनात पाय ठेवणार आहेत.

View All
advertisement