Palghar Accident : आई-बाबांसोबत बाजारात निघालेला दीड वर्षाचा चिमुकला; रस्त्यातील त्या खड्ड्याने घेतला जीव
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
बाईकवरून जात असताना दुचाकी खड्ड्यात गेल्याने एक दीड वर्षांचा चिमुकला खाली पडला. या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला
पालघर (राहुल पाटील, प्रतिनिधी) : परिसरातील रस्ते खराब असतील तर नागरिक अनेकदा याविरोधात आवाज उठवतात. मात्र, कधीकधी हे सगळं करूनही यात कसलीच सुधारणा होत नाही. शेवटी याचा त्रास सामान्य नागरिकांनाच सहन करावा लागतो. रस्त्यांमुळे अनेकदा अपघात होऊन लोकांचे मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर येतात. आता अशीच एक धक्कादायक घटना पालघरमधून समोर आली आहे.
यात बाईकवरून जात असताना दुचाकी खड्ड्यात गेल्याने एक दीड वर्षांचा चिमुकला खाली पडला. या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. बोईसर नवापूर रोडवर ही घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी बोईसरमध्ये रास्ता रोको केला.
advertisement
माहीर मोशीन शिवानी या दीड वर्षीय चिमुकल्याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत. एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळेच चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत स्थानिकांनी यावेळी रास्ता रोको केला. हा चिमुकला आपल्या आई-वडिलांसोबत बाजारपेठेत जात असताना खड्ड्यात बाईक आदळली. यावेळी तो बाईकवरुन खाली पडला आणि या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे .
advertisement
स्थानिकांचा आरोप आहे, की एमआयडीसी बांधकाम विभागाने रस्त्यांची योग्य देखभाल केली नाही. ज्यामुळे या प्रकारचा गंभीर अपघात घडला आहे. त्यांनी विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि तातडीने योग्य कारवाईची मागणी केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 08, 2024 1:23 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Palghar Accident : आई-बाबांसोबत बाजारात निघालेला दीड वर्षाचा चिमुकला; रस्त्यातील त्या खड्ड्याने घेतला जीव


