advertisement

Shocking : भररस्त्यात रिक्षा थांबवली अन् घात केला; शेवटी पोलिसांच्या जाळ्यात अडकला; कारण समोर

Last Updated:

Panvel Crime News : पनवेलमध्ये रिक्षाचालकाने प्रवासी महिलेवर केलेला गुन्हा काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता आणि पोलिसांनी आरोपीला पकडले असून खरे कारण समोर आले आहे.

News18
News18
नवीन मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी नवीन पनवेलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला होता, ज्यात एका प्रवाशी महिलेवर रिक्षाचालकाने चाकू हल्ला केला होता. मात्र आता पोलिसांनी या घटनेचा तपास अवघ्या 48 तासांत लावला असून आरोपीला अटक केली. अक्षय बागडे (वय 27) असे आरोपीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं होतं?
11 फेब्रुवारी रोजी संगीता भोईर या सायंकाळी रिक्षाने घरी जात होत्या. प्रवासादरम्यान आरोपीने रिक्षा बंद पडल्याचे कारण सांगून वाहन बाजूला थांबवले. त्यानंतर अचानक चाकू काढून त्यांच्या गळ्यावर हल्ला केला. आरोपीने त्यांचे मंगळसूत्र, सोनसाखळी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम लुटून घटनास्थळावरून पळ काढला.
रिक्षावरील छोट्या गोष्टीतून उघड झाला गुन्हेगार
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान रिक्षाच्या क्रमांकातील शेवटचे चार अंक मिळाले. त्यावरून इतर रिक्षाचालकांकडे चौकशी करण्यात आली. अखेर अक्षय बागडे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
advertisement
गुन्ह्यामागचं खरं कारण समोर
चौकशीदरम्यान कर्जाच्या ताणातून हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच रिक्षा जप्त केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : भररस्त्यात रिक्षा थांबवली अन् घात केला; शेवटी पोलिसांच्या जाळ्यात अडकला; कारण समोर
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement