advertisement

IND vs PAK मॅचआधी मोठा ट्विस्ट, T20 World Cup मधून पहिली टीम बाहेर!

Last Updated:

West Indies into the super 8 of T20 world cup : सर्वांना कमकुवत वाटणारा वेस्ट इंडिजचा संघाने सर्वात आधी सुपर 8 प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिज आणि नेपाळ यांच्यात वर्ल्ड कपचा 25 वा सामना खेळला गेला होता.

West Indies into the super 8 vs Nepal out of T20 world cup
West Indies into the super 8 vs Nepal out of T20 world cup
T20 world cup 2026 : भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. सर्वांना कमकुवत वाटणारा वेस्ट इंडिजचा संघाने सर्वात आधी सुपर 8 प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिज आणि नेपाळ यांच्यात वर्ल्ड कपचा 25 वा सामना खेळला गेला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने दणक्यात विजय मिळवला अन् सहा पाईंटससह पुढील स्टेजमध्ये प्रवेश केला आहे. तर नेपाळ क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय.
नेपाळची टीम टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून अधिकृतरित्या बाहेर झाली आहे. नेपाळने आपले तिन्ही सामने गमावले असल्याने त्यांना सुपर 8 मध्ये पोहोचता येणार नाही. नेपाळकडे एकही गुण नसल्याने आणि नेट रनरेट -1.942 असल्याने त्यांना काहीही केलं तरी इथून पुढं सुपर 8 मध्ये पोहोचता येणार नाही. ग्रुप सीमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सुपर 8 मध्ये पोहोचेल.
advertisement
West Indies into the super 8 vs Nepal out of T20 world cup
West Indies into the super 8 vs Nepal out of T20 world cup
advertisement
दरम्यान, नेपाळने पहिल्या 20 ओव्हरमध्ये 133 धावा केल्या होत्या. दीपेंद्र सिंग ऐरी याने एकट्याने 58 धावांची खेळी केली तर सोमपाल कामी याने 15 बॉलमध्ये 26 धावांची आक्रमक फटकेबाजी केली. तर वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डर याने चार गडी माघारी धाडले. त्यानंतर वेस्ट इंडिजने 16 व्या ओव्हरमध्ये आरामात धावांचं आव्हान पार केलं. शे होप याने 61 धावांची खेळी केली. तर हेटमायर याने 46 धावा कुटल्या.
advertisement
अपडेट -  विंडीजकडून पराभव पत्करल्यानंतर नेपाळ तिन्ही सामने गमावल्यानंतर स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर पडणारा दुसरा संघ बनला आहे. यापूर्वी, ओमान स्पर्धेतून बाहेर पडला होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK मॅचआधी मोठा ट्विस्ट, T20 World Cup मधून पहिली टीम बाहेर!
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement