राज्यात उष्णतेची लाट, पुन्हा अवकाळीची शक्यता, हवामान विभागानं दिला इशारा, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Mayuri Sarjerao
Last Updated:
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत 29 मार्च रोजी हवामानाची स्थिती काय राहील? याबाबत जाणून घेऊ.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई: राज्यात मार्चअखेर उष्णतेची लाट आली असून उन्हाची तीव्रता वाढली आहे. बहुतांश जिल्ह्यांत तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. तर येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण होण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. 29 मार्च रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत हवामानाची स्थिती काय राहील? याबाबत जाणून घेऊ.
advertisement
मुंबईकर उकाड्याने हैराण
मुंबईत उष्णता वाढली असून उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईचा पारा 33 ते 34 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. मात्र तापमानात सातत्याने वाढ सुरू असून पारा 40 च्या घरात जाण्याची शक्यता आहे. 29 मार्च रोजी मुंबईतील कमाल तापमान 33 ते 34 तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
पुण्याचं तापमान 39 अंश सेल्सिअस
पुण्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहचले आहे. कमाल तापमानासोबत किमान तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. 29 मार्च रोजी पुण्यातील कमाल तापमान 39 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
advertisement
नाशिकनेही गाठला 40 अंशाचा टप्पा
उत्तर महाराष्ट्रातही तापमानात वाढ झाली आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान चाळीशी पर्यंत पोहोचलं आहे. 28 मार्च रोजी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस असणार आहे. तर 29 मार्च रोजी कमाल तापमानात एक अंशानं घट होऊन ते 39 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. तर दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
कोल्हापूरमध्ये अंशत: ढगाळ वातावरण
कोल्हापूरचा पारा हा 39 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. 29 मार्च रोजी कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 29 मार्च रोजी कोल्हापूरचं कमाल तापमान हे 38 अंश सेल्सिअस तर, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे.
advertisement
मराठवाड्यातही उन्हाच्या झळा
मराठवाड्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र 30 तारखेला महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 मार्च रोजी कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस असणार आहे. तर किमान तापमान हे 26 अंश सेल्सिअस असणार आहे. दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
विदर्भात तापमान 40 अंश पार
महिन्याअखेर विदर्भात पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. अकोला पुन्हा सर्वाधिक हॉट ठरले आहे. 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर, नागपूरमध्येही कमाल तापमानाचा पारा हा 40 अंश पार पोहचला आहे. 29 मार्च रोजी नागपूरमधील कमाल तापमान हे 41 अंश सेल्सिअस तर, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. 31 तारखेला अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात वीजांचा कटकडाट, मेघ गर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 28, 2024 8:03 PM IST