अरुण गवळीच्या मुलाला अटक होणार? कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

Crime in mumbai: गुन्हेगारी जगतातून राजकारणाकडे वळलेल्या 'डॅडी' अरुण गवळीचा मुलगा महेश गवळी याला मुंबईतील सत्र न्यायालयाने नुकताच मोठा दणका दिला आहे.

News18
News18
मुंबई: गुन्हेगारी जगतातून राजकारणाकडे वळलेल्या 'डॅडी' अरुण गवळीचा मुलगा महेश गवळी याला मुंबईतील सत्र न्यायालयाने नुकताच मोठा दणका दिला आहे. जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात कोर्टाने महेश गवळीला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. एका महिलेची एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर महेश गवळी यांनी तातडीने अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तथापि, अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. आराध्ये यांनी हा अर्ज नामंजूर केला.

न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं की, तक्रारदार आणि महेश गवळी यांच्यात थेट संबंध असल्याचा कोणताही ठोस प्राथमिक पुरावा सध्या नसला तरी, तपास प्रक्रियेत महेश गवळी यांनी पोलिसांना सहकार्य केले नाही. तपासात सहकार्य न करण्याची ही वृत्तीच त्यांना अटकपूर्व जामीन नाकारण्याचे प्रमुख कारण ठरली, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
advertisement
नैना देवळेकर यांनी केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे, महेश गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता महेश गवळी उच्च न्यायालयात धाव घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
अरुण गवळीच्या मुलाला अटक होणार? कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement