Shivsena Uddhav Thackeray : काल ठाकरेंना पुष्पगुच्छ दिली, आज जय महाराष्ट्र केलं; एकनाथ शिंदेंच्या गळाला 'मोठा मासा' लागला
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का लागला आहे.
उदय जाधव, प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का लागला आहे. शिवसेना आमदार रवींद्र वायकर हे थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, यासाठी ते वर्षा बंगल्यावरही पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू होत्या.
उद्धव ठाकरे यांनी कालच उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या शिवसेना शाखांना भेटी दिल्या, त्यावेळी जोगेश्वरीमध्ये रवींद्र वायकर उपस्थित होते, एवढच नाही तर त्यांनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छही दिला होता. उद्धव ठाकरेंची भेट झाल्यानंतर 24 तासांमध्येच रवींद्र वायकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षही होते. मुंबई महापालिकेला शिवसेना ठाकरे गट आपली तिजोरी समजत होता, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला होता. ठाकरे आणि वायकर कुटुंबियांनी रायगड जिल्ह्यात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचाही आरोप सोमय्यांनी केला होता. जोगेश्वरीतील राखीव भूखंड अपहार प्रकरण आणि रायगडमधील बेहिशोबी मालमत्तेमुळे वायकर ईडीच्या रडारवर आले.
advertisement
ईडीच्या कारवाईमुळे रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आमदार रवींद्र वायकर यांच्यावर पक्षांतर करण्यासाठी ED कारवाईचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता.

वायकरांवर काय आहेत आरोप?
रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी सुप्रीमो क्लब जमीन प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची महापालिका प्रशासनाची तयारी दर्शवलीय. महापालिकेने अचानक दाखवलेल्या तयारीने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायलयात अंतिम टप्यात असताना महापालिकेने प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची तयारी असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केलं. महापालिकेच्या सावध पवित्र्यामुळे रवींद्र वायकरांविरोधातील आरोप न्यायालयीन लढ्यात टिकण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ED ने आमदार रवींद्र वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. रवींद्र वायकर यांच्या घरी आणि कार्यालय तसंच सुप्रीमो क्लब येथे ईडीने छापा टाकून त्यांची चौकशीही केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या सप्टेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 10, 2024 7:13 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shivsena Uddhav Thackeray : काल ठाकरेंना पुष्पगुच्छ दिली, आज जय महाराष्ट्र केलं; एकनाथ शिंदेंच्या गळाला 'मोठा मासा' लागला