advertisement

वॉचमनने क्रिकेट खेळण्यापासून रोखलं अन् मुलाने संतापात ओलांडली सीमा; डोंबिवलीतील घटना

Last Updated:

Dombivli Crime News : डोंबिवलीत क्रिकेट खेळण्यापासून थांबवल्याने संतापलेल्या अल्पवयीन मुलाने असं काही केलं आहे ,ज्याने संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

News18
News18
डोंबिवली : डोंबिवली शहरात एक धक्कादायक घटना घडली असून एका अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात येत सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे अख्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील टाटा नाका परिसरातील एका मॉलजवळ ही घटना घडली आहे. या ठिकाणी मोकळी जागा असल्याने परिसरातील मुले नेहमीप्रमाणे येथं क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात. मात्र खेळताना बॉल हा इतर नागरिकांना लागू शकतो किंवा गंभीर दुखापत होऊ शकते, याची काळजी घेत तो सुरक्षा रक्षक मुलांना वारंवार सांगत होता.
 त्या अल्पवयीन मुलाचं भयानक पाऊल
घटनेच्या दिवशीही सुरक्षा रक्षक तुकाराम सुपुगडे(वय75) यांनी एका मुलाला मॉलच्या परिसरात क्रिकेट खेळू नकोस असे सांगितले होते. असं ऐकताच त्या अल्पवयीन मुलाला राग आला. त्यांच्यातील वाद वाढत गेला आणि रागाच्या भरातच मुलाने सुरक्षा रक्षकावर दगडाने हल्ला केला.
advertisement
या हल्ल्यात सुरक्षा रक्षक हे गंभीर जखमी झाले. तातडीने परिसरातील नागरिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान या प्रकरणाती माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु केला आहे. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
वॉचमनने क्रिकेट खेळण्यापासून रोखलं अन् मुलाने संतापात ओलांडली सीमा; डोंबिवलीतील घटना
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement